🕒 1 min read
मुंबई : भारतीय क्रिकेटचा दिग्गज खेळाडू व्यंकटेश प्रसाद त्याच्या गोलंदाजीतील अचूक लाइन लेथसाठी ओळखला जायचा. शांत स्वभावाचा हा गोलंदाज मैदानावर फार क्वचितच रागावलेला पाहायला मिळायचा. पण त्याचा रागवण्याचा एक किस्सा सध्या खूप व्हायरल होत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात प्रसाद चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर आता इतक्या वर्षांनंतर तो पुन्हा एकदा त्याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे.
क्रिकेटच्या डिस्टन्स कोचिंगमध्ये व्यस्त असलेला व्यंकटेश प्रसाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी हे प्रकरण कोणत्याही खेळाडूशी संबंधित नसून पाकिस्तानच्या सोशल मीडिया यूजरशी संबंधित आहे. नुकतेच त्याने असे सडेतोड उत्तर एका पाकिस्तानी ट्विटर वापरकर्त्याला दिले आहे. वापरकर्त्याने प्रसादला पाकिस्तानचा माजी सलामीवीर अमीर सोहेलसोबत केलेल्या बहुचर्चित मैदानावरील वादाबाबत आठवण करून दिली. त्यांवर प्रसादने त्या पाकिस्तानी नेटकऱ्याला कठोर उत्तर दिले आहे.
एका पाकिस्तानी नेटकऱ्याने प्रसादच्या आमिरसोबत झालेल्या भांडणाचा फोटो शेअर केला. हा फोटो १९९६ च्या सामन्याची आठवण करून देणारा असावा. बंगळुरूमधील या एकदिवसीय सामन्यात आमिरने चौकार मारल्यानंतर प्रसाद खुन्नस दिली होती. तोच फोटो नेटकऱ्याने शेअर केले होता.
Yes dear Murad, I do.
He was arrogant in this image you posted, you need to see the next ball to know what arrogance can do-
Uproot which in Hindi means Ukhaad. https://t.co/EPqfgXm0tK— Venkatesh Prasad (@venkateshprasad) June 12, 2022
प्रसादने या ट्विटला प्रतिक्रिया देताना असे काहीतरी लिहिले. त्यानंतर हे प्रकरण पूर्णपणे लपवून पाकिस्तानी यूजर गायब झाला. पाकिस्तानी युजरने लिहिले होते की, वेंकी तुला हे आठवत असेल. यावर उत्तर देताना प्रसादने लिहिले, होय, मला मुराद चांगली आठवण आहे. आपण शेअर केलेल्या या छायाचित्रात तो अहंकारी होता. गर्विष्ठ लोक काय करू शकतात हे पाहण्यासाठी तुम्ही पुढील गोष्ट देखील पहा. पुढे प्रसादने लिहिले, अपरुत ज्याचा हिंदीत अर्थ उपटणे असा होतो.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
