Share

“मला IPL मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळायचंय…”, भारताच्या महिला क्रिकेटपटूचं स्वप्न!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची युवा फलंदाज यास्तिका भाटियाने आयपीएल (IPL) बाबत प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच संपलेल्या महिला टी-२० चॅलेंजमध्ये वेलॉसिटी संघाचे प्रतिनिधित्व केले. अंतिम फेरीत शेवटच्या चेंडूवर तिचा संघ पराभूत झाला असला, तरी या स्पर्धेने भारतीय संघाला अनेक स्टार्सवर लक्ष ठेवण्याची संधी दिली आहे, असे २१ वर्षीय यास्तिकाने सांगितले.

पुढील वर्षी महिला आयपीएलचे आयोजन केले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यास्तिका भाटिया या स्पर्धेसाठी खूप उत्साहित आहे आणि तिला मुंबई इंडियन्समधून खेळायचे आहे. यास्तिका म्हणाली, ”महिला आयपीएलमध्ये कोणत्याही संघाने माझी निवड करावी, ते ठीक आहे. पण मला पर्याय मिळाला तर मला मुंबई इंडियन्सकडून खेळायला आवडेल. मी लहानपणापासून या संघाला फॉलो करत आहे आणि हा माझा आवडता संघ आहे.”

यस्तिका भाटिया यष्टीमागून गोलंदाजांशी खूप संवाद साधताना दिसली आणि ती सामन्यादरम्यान वातावरण आनंददायी ठेवण्याचा प्रयत्न करते. ती सुरुवातीच्या दिवसांपासून यष्टीरक्षण करत आहे आणि तिला भविष्यात यावर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि सतत सुधारणा करायची आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!