🕒 1 min read
नवी दिल्ली : गेल्या दशकामध्ये देशात वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. यामुळे वाहन क्षेत्रास तेजी मिळाली असली तरी प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. यामुळेच वाहनांच्या इंजिनांमध्ये देखील महत्वाचे बदल केले गेले. आता, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी महत्वाचे केली आहे.
पेट्रोल-डिझेल अशा इंधनांऐवजी इलेक्ट्रिक वाहने, इथेनॉलचा इंधन म्हणून वापर करणे, सीएनजी व इलेक्ट्रिक सार्वजनिक वाहतूक सेवा यावर नितीन गडकरी यांनी भर दिला आहे. सार्वजनिक वाहतूक सेवेतील वाहने त्यांच्या देखभालीच्या कमतरतेमुळे अधिक प्रदूषण करतात त्यामुळेच त्यांनी पर्यायी व्यवस्थेवर भर दिला आहे.
आता भारतातील सरकारी विभाग आणि PSUs द्वारे खरेदी करण्यात आलेल्या 15 वर्षांपेक्षा जास्त जुनी वाहनं आता थेट भंगारात जाणार आहेत. वाहनांना स्क्रॅप करण्याच्या धोरणाला लवकरच अधिसूचित केले जाणार असून, 1 एप्रिल 2022 पासून याची अंमलबजावणी होणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या निवेदन जारी केले आहे.
‘महामार्ग आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी 15 वर्षांहून अधिक जुन्या सरकारी विभाग आणि पीएसयूच्या मालकीच्या वाहनांची नोंदणी रद्द करणे आणि स्क्रॅपिंगच्या धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे.’ 15 जानेवारी रोजी नितीन गडकरी म्हणाले होते की, ‘आम्ही हा प्रस्ताव सादर केला आहे आणि लवकरात लवकर स्क्रॅपिंग धोरणाला मान्यता मिळेल, अशी मला आशा आहे.’ आता या धोरणाला मंजुरी मिळाली असली तरी 1 एप्रिल 2022 पासून याची अंमलबजावणी होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथामध्ये ‘राम मंदिरा’ने पटकावला पहिला क्रमांक !
- जिल्हा नियोजन बैठकीत नारायण राणे व विनायक राऊत यांच्यात राडा; उदय सामंत यांची मध्यस्थी
- तृप्ती देसाईंच्या मागणीवर माहूरगड विश्वस्तांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- शेतमाल विक्रीचे कसब शेतकऱ्याने अंगिकारले तर निश्चित फायदा होईल : अशोक चव्हाण
- केंद्र पुरस्कृत सिंचन प्रकल्प पुढील दोन वर्षात पूर्ण करणार – जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

