Share

तृप्ती देसाईंच्या मागणीवर माहूरगड विश्वस्तांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी साडेतीन पीठांपैकी एक पीठ असलेले श्रीक्षेत्र माहूर येथील रेणुकादेवी मंदिरात एकही महिला पुजारी नाही. शक्तिपीठ देवीचे असूनही देवीला अभिषेक, साडी, मंगळसूत्र घालण्याचे काम पुरुष पुजारी करतात. या ठिकाणी ५० टक्के महिला पुजारी हवेत, अशी मागणी केली होती. या ठिकाणी महिला पुजारी घेऊन राज्यात आदर्श निर्माण करावा, मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिला. यावर मंदिराचे विश्वस्त चंद्रकांत भोपी यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी संवाद साधला आहे.

चंद्रकांत भोपी म्हणाले, माहूरगड देवी संस्थानातील पुजाऱ्यांचे प्रकरण औरंगाबाद उच्च न्यायालयात १९७२ पासून सुरू आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने विश्वस्त मंडळ तयार करण्याचे आदेश २०१४ मध्ये दिले आहेत. तसा निकाल पण लागलेला आहे. ते म्हणाले, कोणीही कोणतीही मागणी करू शकतात. परंतू १९७२ पासून उच्च न्यायालयामध्ये केस सुरू आहे. परंतू इथे परंपरागत पद्धतीने अनादी काळापासून पुजाऱ्याने पूजा करण्याचे काम अविरतपणे सुरू आहे. माहूर गडावर कोणताही भेदभाव किंवा दुजाभाव होत नाही. तसेच हे मूळ शक्तीपीठ आहे. त्यामुळे इथे महाराष्ट्रासह देशभरातून देवीचे भक्त दर्शनासाठी तसेच इतर धार्मिक विधीसाठी नियमितपणे येतात.

दरम्यान, तृप्ती देसाई यांनी रेणुकादेवी मंदिरात महिला पुजारी अशी मागणी केल्यानंतर त्यांच्यावर भाविकांमधून टीका केली जात आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी देवी-देवतांच्या मुद्द्यांचा आधार घेणे टाळावे असा इशारा भाविकांनी दिला आहे. देसाई यांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात पुणे येथे गुरुवारी ब्राह्मण महासंघाच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तृप्ती देसाई सातत्याने हिंदू धर्माच्या परंपराबाबत विरोधी भूमिका घेत असतात. फक्त पब्लिसिटी स्टंट त्या करत असतात. मात्र यापुढे हे खपवून घेणार नाही, असे ब्राह्मण महासंघाच्या महिला कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.यावेळी जिल्हाध्यक्षा मधुरा बर्वे, शहराध्यक्षा नीता जोशी, युवती आघाडी प्रमुख क्रांती गोखले आणि प्रदेश पदाधिकारी तृप्ती तारे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!