Share

प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथामध्ये ‘राम मंदिरा’ने पटकावला पहिला क्रमांक !

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी राजपथावर देशाच्या सामर्थ्याचं, विविधतेतील एकतेचं, प्रत्येक राज्यातील संस्कृतीचं दर्शन घडत असतं. यंदा ७२ व्या प्रजासत्ताक दिनी सहभागी राज्यांचे चित्ररथ हे उल्लेखनीय होते. उत्तर प्रदेश राज्याच्या चित्ररथाने पहिला क्रमांक पटकावला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून राम मंदिर प्रतिकृती असलेल्या या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात येणार आहे.

२०१९ च्या अखेरीस सर्वोच्च न्यायालयात गेले अनेक दशकांचा राम मंदिराचा प्रश्न सोडवण्यात आला. यानंतर ऑगस्ट २०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री रामजन्मभूमी मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. करोडो रामभक्तांचं स्वप्न आता साकारण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या चित्ररथामध्ये राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली होती. यासह महर्षी वाल्मिकी यांची रामायण लिहितानाची प्रतिकृती साकारण्यात आली होती.

हा चित्ररथ समोर येताच उपस्थितांनी देखील जोरदार प्रतिसाद देऊन स्वागत केलं होतं. दरम्यान, उत्तर प्रदेशचे माहिती संचालक शिशिर यांच्याकडून (IAS) उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाल्याची माहिती देण्यात आलीय. ‘यंदाच्या वर्षी प्रजासत्ताक दिवसाला उत्तर प्रदेशच्या भव्य चित्ररथाला प्रथम स्थान देऊन गौरव करण्यात आला. सर्व चमूला हृदयापासून शुभेच्छा. गीतकार विरेंद्र सिंह यांचे विशेष आभार’ असं ट्विट त्यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!