🕒 1 min read
नवी दिल्ली : पंतप्रधान कृषी सिंचन योजना आणि बळीराजा जल संजीवनी योजना केंद्र शासन पुरस्कृत सिंचन योजनांतर्गत राज्यातील विविध सिंचन प्रकल्प पुढील दोन वर्षात पूर्ण केले जातील, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी आयोजित महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांची प्रगती आणि समस्या संदर्भात आढावा घेण्यात आला.
या बैठकीस केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत, माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावेडकर, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीष बापट, डॉ.सुभाष भामरे, सुनिल मेंढे आणि जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम तसेच केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प हा 2023 पर्यंत पूर्ण केला जाईल, कोविड महासाथीमुळे या प्रकल्पातील कामांची गती मंदावली होती तसेच काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. या विषयासंदर्भात आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. केंद्राकडून पूर्ण मदतीचे आश्वासन मिळाले. या राष्ट्रीय प्रकल्पासाठी केंद्र व राज्याकडे पुरेसा निधी उपलब्ध असून या कामांना गती देण्याबाबत आजच्या बैठकीत एकवाक्यता झाली, असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
यासह पंतप्रधान कृषी सिंचन योजने अंतर्गत येणारे 26 प्रकल्प आणि बळीराजा जल संजीवनी योजने अंतर्गत येणाऱ्या 91 प्रकल्पांना केंद्राकडून अर्थसहाय्य केले जाते. या योजनांमधील प्रकाल्पांची कामे अंतिम टप्प्यात असून एकूणच प्रकल्प येत्या दोन ते अडीच वर्षांच्या कालावधीत पूर्ण केले जातील. याशिवाय ज्या प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी आहेत अशा प्रकल्पांविषयी राज्यपालांशी चर्चा करून प्रकल्पांना गती देण्याचे काम केले जाईल, असेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील जींगाव, सुलवाडे आदी मोठ्या जलसिंचन प्रकल्पांना राष्ट्रीय प्रकल्पांचा दर्जा मिळावा, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली, यासह नदीजोड प्रकल्पासंदर्भातही बैठकीत चर्चा करण्यात आली, असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- ग्रामीण विद्यार्थ्यांना भरतीत प्राधान्यासाठी FLIP TPO संकल्पना – डॉ. अभय वाघ
- ‘मुंबईला केंद्रशासित प्रदेश करावं या मागणीशी फडणवीस आणि चंद्रकांत पाटील सहमत आहेत का ?’
- तेरा वर्षीय मुलीसोबत लग्न, नवरदेवाविरोधात पॉक्सोचा गुन्हा
- राष्ट्रवादीला खिंडार पाडत अखेर धवलसिंह मोहिते पाटलांनी धरला काँग्रेसचा हात
- बालानगर खादगावचे शेकडो अतिवृष्टीग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

