Share

शेतमाल विक्रीचे कसब शेतकऱ्याने अंगिकारले तर निश्चित फायदा होईल : अशोक चव्हाण

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कृषी विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात तीन दिवसीय रयत बाजार आयोजीत करण्यात आला होता. या बाजाराचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बाधंकाममंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ज्या मालाची मागणी बाजारपेठेत आहे ते आपल्या शेतात पिकवून बाजारपेठेत तो स्वत:  विकण्याचे कसब शेतकऱ्यांनी अंगीकारावे. त्याचा निश्चीतच फायदा होईल असे चव्हाण म्हणाले.

मोठ्या कष्टाने उत्पादन केलेल्या बळीराजाच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने विकेल ते पिकेल धोरणाअंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान आयोजीत करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात रयत बाजारासाठी जवळपास ६० स्टॉलची उभारणी करण्यात आली होती. या रयत बाजारात नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील यशस्वी शेतकऱ्यांचा यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी विविध शेतकऱ्यांनी शेतात राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची यशोगाथा असलेल्या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. या समारंभात जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधवांनी आपापल्या शेतमालासह मोठ्या प्रमाणावर उपस्थिती नोंदवली. या उपक्रमास अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला असून मोठ्या प्रमाणावर या सर्व शेतमालाची विक्री झाली. आणि थेट विक्रीमुळे शेतकऱ्यांनाही अधिकचा दर मिळाल्याने फायदा झाला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!