Share

जिल्हा नियोजन बैठकीत नारायण राणे व विनायक राऊत यांच्यात राडा; उदय सामंत यांची मध्यस्थी

Published On: 

🕒 1 min read

सिंधुदुर्ग:- भाजप खासदार नारायण राणे आणि शिवसेना नेत्यांमध्ये असलेलं वैर सर्वश्रूत आहे. नारायण राणे शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. त्यातही शिवसेना सत्तेत असल्यामुळे राणे शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर टोकाची टीका करताना दिसतात. त्यांच्या या टीकेमुळे शिवसेनेच्या नेत्यांकडूनही राणे यांच्यावर प्रतीवार केला जातो.

तिलारी धरणाचा डावा कालवा फुटल्याच्या विषयावरून आज जिल्हा नियोजन बैठकीत भाजप खासदार नारायण राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. राणे-राऊत यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाल्यामुळे नंतर दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनीही सभागृहात राडा घातला. हा वाद टोकाला गेल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांना मध्यस्थी करावी लागली.

तिलारी धरणाचा डावा कालवा फुटल्याच्या मुद्द्यावरुन भाजप सदस्य राजन म्हापसेकर यांनी बैठकीत भूमिका मांडली. मात्र त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर शिवसेनेचे सदस्य बाबुराव धुरी यांनी आक्षेप नोंदवला. नंतर हाच आक्षेप राणे आणि राऊत यांच्यामध्ये शाब्दिक वादाचं कारण बणला. हा वाद नंतर टोकाला गेल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांना मध्यस्थी करावी लागली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!