औरंंगाबाद : शहरात गेल्या काही महिन्यापासून वाहन चोरीचे सत्र सुरू आहे. वाढत्या वाहन चो-या रोखण्यासाठी पोलिसांच्या वतीने शहरात नाकाबंदी मोहिम राबविण्यात येत असतांना देखील वाहन चो-याचे सत्र थांबत नसल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. चोरट्यांनी शहराच्या विविध भागातून पुन्हा पाच दुचाकी लंपास केल्या आहेत.
अनिल भारतअप्पा बोंद्रे (वय ३५, रा.पवननगर, रांजणगांव-शेणपुंजी) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२८-एएम-१६६७) चोरट्याने १५ फेब्रुवारी रोजी महाराणा प्रताप चौकातील गरूड झेप जवळून चोरून नेली. अतुल गंगाधर ठोंबरे (वय ३३, रा.खंडेश्वर सोसायटी, सातारा परिसर) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-डीजी-२१५९) चोरट्याने २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पोद्दार शाळेजवळील देशपांडे पुरम येथून चोरून नेली. सुनिल मंगलसिंग पाटील (वय २५, रा.वाळुज, ता.गंगापुर) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-ईक्यू-१२५८) चोरट्याने २४ फेब्रुवारी रोजी वाळूज परिसरातील झेंडा मैदानातून चोरून नेली.
लइखोद्दीन बद्रोउद्दीन शेख (वय ५८, रा.गुलशन महेलजवळ) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-डीवाय-५८८६) चोरट्याने २४ फेब्रुवारी रोजी गांधीपुतळ्याजवळील नवाब जानी मशिदीजवळून चोरून नेली. सय्यद फजलुल हक सय्यद नोरूल हक (वय ५३, रा.राहत कॉलनी, पंचायत समितीजवळ) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एक्यू-१३७१) चोरट्याने २५ फेब्रुवारी रोजी शहागंज भाजीमंडई परिसरातून चोरून नेली.
शहराच्या विविध भागातून दुचाकी वाहन चोरून नेणा-या चोरट्याविरूध्द अनुक्रमे एमआयडीसी वाळूज, जवाहरनगर, वाळूज आणि सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- उदगीरात जनता कर्फ्यूचा बोजवारा, नागरिकांनी प्रशासनाचे आवाहन धुडकावले
- ‘यांच्या जागी तुमची मुले असती तर काय केले असते?’ जितेंद्र आव्हाडांचा सवाल
- चंद्रकांत पाटलांनी घेतलेल्या ‘त्या’ निर्णयावर बीडचे राजकीय भवितव्य अवलंबून!
- दारू विकणाऱ्यानेच दिली दारू विक्रीची तक्रार, मग काय? खाल्ला मार!
- याजसाठी केला होता अट्टाहास, पण शेवट वाईट झाला! चित्रा वाघ यांचा भाजप प्रवेश निष्फळ?


