Share

चंद्रकांत पाटलांनी घेतलेल्या ‘त्या’ निर्णयावर बीडचे राजकीय भवितव्य अवलंबून!

Published On: 

🕒 1 min read

बीड : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आदर्श उपविधीतील नियमानुसार सेवा संस्था मतदारसंघातील ११ जागांसाठी तब्बल ८७ उमेदवारी अर्ज बाद झाले होते. यातील ४८ उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात सहनिबंधक लातूर यांच्याकडे अपील केले आहे. या प्रकरणाची सुनावणी ४ मार्चला होणार आहे. दरम्यान, तत्कालीन सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपविधीतील पोटनियम ३४ ए (५) मधल्या अटीला अंतरिम स्थगिती दिली होती. त्या प्रकरणाची अंतिम सुनावणी २ तारखेला सहकार मंत्र्यांच्या न्याय कक्षेत होणार असल्याने या सुनावणीकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे.

गेल्या पाच वर्षांपूर्वी तत्कालीन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा बँकेच्या आदर्श उपविधीतील पोट कलम ३४ ए (५) यामधील अटींना अंतरीम स्थगिती दिली होती. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपुर्वी उपविधीतील नियमानुसार अ आणि ब दर्जा नसलेल्या संस्थांच्या उमेदवारांनाही निवडणूक लढवता आली होती. यावर्षी मात्र जिल्हा बँकेच्या उपविधीतील नियमांवर बोट ठेवून निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास देशमुख यांनी संस्था मतदारसंघातल्या सर्वचे सर्व ८७ उमेदवारांना निवडणूक लढवण्याबाबत अपात्र ठरवले.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारतीय जनता पार्टीसह अन्य पक्ष-संघटनेच्या तब्बल ४८ उमेदवारांनी सहकार सहनिबंधक, लातूर यांच्या कोर्टात धाव घेतली. आपआपल्या वकिलांमार्फत या निर्णयाला आव्हान दिले. या प्रकरणाचा निकाल १० दिवसात देणे क्रमप्राप्त असल्याने या प्रकरणाची सुनावणी आणि अंतिम निर्णय ४ मार्च रोजी होणार आहे.

या प्रकरणाकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून असतानाच तत्कालीन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकाळात १ एप्रिल २०१५ रोजी दाखल असलेल्या धनराज राजाभाऊ मुंडे यांच्या प्रकरणातील सुनावणीही येत्या दोन दिवसात २ मार्च रोजी सहकार मंत्र्यांच्या न्याय कक्षेत होणार आहे. या सुनावणीकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!