Share

उदगीरमध्ये जनता कर्फ्यूचा बोजवारा, नागरिकांनी प्रशासनाचे आवाहन धुडकावले

Published On: 

लातूर : लातूर जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शनिवार,रविवार असे दोन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. उदगीर तालुक्यात कर्फ्यू पाळावा असे सांगण्यात आले होते. मात्र, प्रशासनाच्या सर्व आवाहनांना झुगारत उदगीर शहरातील नांदेड बिदर या मुख्य रस्त्यासह मोंढा रोड, देगलूर रोड, बस स्थानक परिसर, मुक्कावार चौक, पत्तीवार चौक, उद्योग भवन परिसर येथे अनेक व्यावसायिकांनी आपले दैनंदिन व्यवहार सुरू ठेवलेत. ऑटो रिक्षा, भाजीविक्रेते, फळविक्रेते यांनी रस्त्यावर गर्दी करून आपली दुकाने थाटल्याचे चित्र पाहायला मिळाले. शिवाय नागरिकांचीही रस्त्यावर मोठी वर्दळ दिसून येत आहे. त्यामुळे जनता कर्फ्यूचा फज्जा उडाल्याची स्थिती दिसून येत आहे.

उदगीरचे उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, शहर पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनी अनेक वेळा जनता कर्फ्युसाठी जनजागृती अभियान राबवले होते. सर्व नागरिकांना कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संसर्गाची साखळी तोडण्यासाठी दोन दिवस घराबाहेर पडू नये गर्दी टाळावी, मास्क परिधान करावे, विनाकारण रस्त्यावर फिरू नये असे आवाहन केले होते.

या जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेने स्वतः होऊन जनता कर्फ्यूचे पालन करावे, त्यात प्रशासनाचा कुठलाही हस्तक्षेप राहणार नाही अशी भूमिका जाहीर केली. कारवाईची भीती नसल्याने व्यावसायिक, हातगाडीवाले व ऑटोचालकांनी बिनधास्तपणे आपले व्यवसाय सुरू ठेवून जनता कर्फ्युचा फज्जा उडवला.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!