गाजियाबाद : उत्तर प्रदेश मधील गाजियाबाद येथे एका शुध्द शाकाहारी महिलेने पिज्जा ऑर्डर केला पण कंपनीने व्हेज नॉनव्हेज पिज्जा पाठवला. मग काय त्या महिलेने पिज्जा डिलिव्हर करणाऱ्या कंपनीला थेट कोर्टातच खेचलं. एवढचं नाही तर त्या शाकाहारी महिलेने संबंधित कंपनीवर थेट एक कोटी रुपयांचा दावा देखील ठोकला आहे. महिला म्हणाली की यामुळे माझे जे नुकसान झाले आहे ते भरून काढण्यासाठी मला महाग आणि अवघड कर्मकांडातून जावे लागणार आहे.
दिपाली त्यागी असे या महिलेचे नाव आहे. त्यागी यांनी आपल्या याचिकेत दावा केला आहे की, ‘मी माझ्या धार्मिक श्रद्धा, शिकवण, कौटुंबिक परंपरा, स्वतःचा विवेक आणि स्वतःची सर्वोत्तम निवड यामुळे शुद्ध शाकाहारी आहे’.
२१ मार्च २०१९ रोजी होळी साजरी केल्यानंतर दिपाली त्यागी यांनी आपल्या कुटुंबासाठी पिज्जा आउटलेट मधून शाकाहारी पिज्जा ऑर्डर केला होता. मुळात पिज्जा डिलेव्हरी उशिरा झाली पण त्यागी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. जसा त्यांनी पिज्जाचा बॉक्स उघडला आणि पहिला घास घेताच त्यांच्या लक्षात आले की, यामध्ये मशरूम ऐवजी मांसाचे तुकडे आहेत. त्यांगींच्या वकिलांनी कोर्टात सांगितले आहे की, दिपाली यांनी हा प्रकार लक्षात येताच ग्राहक मंचात फोन केला. आणि आपल्या घरी व्हेज ऐवजी पाठवला नॉनव्हेज पिज्जा देण्याचे बेजबादार काम संबंधित कंपनीने केले असल्याची तक्रार दाखल केली.
काही दिवसांतच संबंधित कंपनीच्या एका अधिकाऱ्याने दिपाली यांना फोन करून ‘आम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मोफत पिज्जा देऊ’ असे आमिष दाखवले. मात्र दिपाली यांनी त्या अधिकाऱ्याला खडे बोल सुनावत ही काही साधी केस नसून यामध्ये आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असल्याचे सांगितले. यानंतर पिडीत महिलेने दिल्ली जिल्हा ग्राहक मंचामध्ये याबाबत गुन्हा दाखल केला आहे. यावर कंपनीला जाब विचारला गेला आहे. या खटल्याची पुढील सुनावणी १७ मार्च रोजी होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करायची असेल तर करा – नाना पटोले
- ‘या प्रकरणातील सत्य शोधून काढा आणि…’ ; झोमॅटो मारहाण प्रकरणात परिणीती चोप्राची उडी
- …म्हणून अजित पवारांनी फडणवीसांसोबत एकाच मंचावर येणं टाळलं
- ‘महाविकास आघाडीला १७१ आमदारांचा पाठींबा आहे, आम्ही निवडणुकीला घाबरत नाही’
- ईशान किशन जे बोलला ते ऐकून विराट त्याला संघात जागा देण्याचा नक्कीच विचार करेल !


