Share

ईशान किशन जे बोलला ते ऐकून विराट त्याला संघात जागा देण्याचा नक्कीच विचार करेल !

Published On: 

अहमदाबाद : टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी -20 मालिकेतील पहिला सामना गमावला आहे. पहिल्या सामन्यात स्टार बॅट्समन आणि ‘मॅच विनर’ खेळाडूंच्या अपयशानंतर भारतीय संघ रविवारी इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या टी -२० सामन्यात नवीन रणनीती आखून मैदानात उतरणार.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सायंकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. पहिल्या टी -२० दरम्यान इंग्लंडने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिघांमध्ये जबरदस्त कामगिरी केली. पण हे देखील मान्य करावे लागेल की पराभवानंतर विराट कोहलीची टीम शानदार पुनरागमन करण्यात पटाईत आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचा पहिला सामना गमावल्यानंतर टीम इंडियाने पुढील तीन सामने जिंकून मालिका ३-१ ने जिंकली.

सलामीच्या सामन्यापूर्वी कोहलीने ‘एक्स फॅक्टर’ (सामना जिंकणारे खेळाडू) बद्दल बोलला, त्यामुळे रिषभ पंत आणि हार्दिक पांड्याकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे. दोघेही बेजबाबदारपणे विकेट गमावत होते. श्रेयस अय्यर वगळता कोणताही भारतीय फलंदाज इंग्लंडच्या जोफ्रा आर्चर आणि मार्क वुड यांच्या नेतृत्वात गोलंदाजीला सामोरे जाऊ शकला नाही.

असाच एक ‘एक्स फॅक्टर’ खेळाडू सध्या भारतीय संघात संधी मिळण्याची वाट पाहत आहे. मुंबई इंडियन्सचा तडाखेबंद फलंदाज ईशान किशनने २०२० मध्ये ५१६ धावांचा रतीब लावला होता. तर नुकतेच विजय हजारे मालिकेत केवळ ९८ चेंडूत ताबडतोड १७६ धावा पटकवल्या होत्या. त्यामुळे इशान किशनला इंग्लंड विरुद्ध टी-२० मालिकेत संधी देण्यात आली आहे. मात्र सध्याच्या भारतीय संघात पहिल्या ११ खेळाडूंमध्ये जागा मिळवणे इशान साठी मोठे जिकरीचे काम असणार आहे.

संघात जागा मिळण्याबाबत ईशान किशन म्हणाला आहे की, ‘या संघात जागा मिळवणे खूपच अवघड आहे. पण मी कोणत्याही स्थानावर खेळण्यास तयार आहे.मी माझ्या करियरमध्ये मिडिल ऑर्डर तसेच टॉप-ऑर्डरमध्ये देखील खेळलो आहे’. ज्या सामन्यात प्रेशर असते त्या सामन्यात मी अधिक आत्मविश्वासाने खेळतो. मला असे वाटते की डॉमेस्टिक फॉर्मेट्स आणि इंडिया ए च्या सामन्यांत प्रेशर मध्ये कसे खेळावे याची मदत मिळते’. ईशान किशनचे हे आत्मविश्वासाने भरलेले वाक्य ऐकून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली त्याला संघात संधी देण्याचा एकदा तरी नक्की विचार करेल हे मात्र नक्की.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!