Share

‘महाविकास आघाडीला १७१ आमदारांचा पाठींबा आहे, आम्ही निवडणुकीला घाबरत नाही’

Published On: 

सांगली : नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देत काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेतली आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदावर कोणाची नियुक्ती होणार, यावरून राज्याच्या राजकारणात मोठी उत्सुकता आहे.

दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक वावही यासाठी भाजप आग्रही होती. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीला महाविकास आघाडी सरकार घाबरत असल्याची टीका देखील भाजपने केली होती. तर, काँग्रेस देखील अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याआधी नव्या विधानसभा अध्यक्षांची नेमणूक व्हावी यासाठी आक्रमक होती. अधिवेशनाचा कालावधी या निवडणुकीसाठी वाढवावा अशी मागणी देखील काँग्रेसने केली होती. मात्र, ही निवडणूक न झाल्याने काँग्रेस नाराज असल्याचं बोललं जात आहे.

आज सांगलीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपच्या टीकांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल. १७१ आमदारांचा महाविकास विकास आघाडीला पाठिंबा आहे, त्यामुळे आम्ही निवडणुकीला घाबरत नाही.’ असं भाजपला खडसावतानाच त्यांनी, ‘विशेष अधिवेशन घेऊन येत्या काही दिवसात अध्यक्ष निवड होईल. कुणाला घाबरण्याचे कारण नाही,’ अशी माहिती देखील दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!