Share

…म्हणून अजित पवारांनी फडणवीसांसोबत एकाच मंचावर येणं टाळलं

Published On: 

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दीड वर्षांपूर्वी शपथविधी पार पडला होता. यामुळे राज्याच्या राजकारणात भूकंप झाला होता. हे सरकार फार काळ टिकू नसलं तरी राजकीय फासे हे कसे पलटू शकतात याचं एक उदाहरण राज्याला पाहायला मिळालं होतं.

यानंतर, पवार-फडणवीस एकत्र येणार म्हटल्यावर सर्वांच्याच भुवया उंचावल्या जातात. काही महिन्यांपूर्वी हे दोन्ही नेते पुणे महापालिकेच्या एका कार्यक्रमासाठी एकत्र आले आणि कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला होता. आता हे दोन्ही नेते पुन्हा एकाच मंचावर येणार असल्याच्या शक्यता निर्माण झाल्या होत्या. कारण होतं अभिनेते प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाच्या ४०० व्या प्रयोगाचं !

गेल्यावर्षी १४ मार्च रोही या नाटकाचा शेवटचा प्रयोग झाला होता. आता वर्षभराने आजच १४ मार्च रोजी या नाटकाचा ४०० वा प्रयोग होत आहे. हा प्रयोग पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार असून देवेंद्र फडणवीसांसह अजित पवार यांना देखील या खास प्रयोगासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं.

मात्र, राज्यातील कोरोनाची स्थिती वाढत असल्याने कडक निर्बंध लागू करण्यात आले असून राज्यात सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. ‘ज्या कार्यक्रमाला पन्नास पेक्षा अधिक लोक जमा होणार असतील तर त्या जाहीर कार्यक्रमास उपस्थित राहणार नाही’ असा निर्णय अजित पवार यांनी घेतल्यामुळे ते आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं समजत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!