Share

सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करायची असेल तर करा – नाना पटोले

Published On: 

सांगली : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. वाझे यांची बदली करण्यात आली होती. याप्रकरणी सचिन वाझे यांना एनआयए ने अटक केली आहे. अटकेपूर्वी तब्बल 13 तास सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली.

सचिन वाझे यांना निलंबित करून अटक करावी अशी मागणी भाजप नेत्यांनी करत आक्रमक भूमिका घेतली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील याचे पडसाद उमटले होते. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याच मुद्द्यावरून भाजपवर गंभीर आरोप करत सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे.

‘महाराष्ट्राला बदनाम करण्याचे एक धोरण हे विरोधकांच्या माध्यमातून सुरू झाले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आले तेव्हापासून याच घडामोडी दिसत आहे. सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करायची असेल ती करावी. तपास यंत्रणाही त्यांच्याकडे आहे. त्यांना काय टेस्ट करायची असेल तर त्यांनी करावी. डबल ढोलकी वाजवायचे काम विरोधक करत आहेत. त्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,’ अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. दरम्यान, सचिन वाझे यांना एनआयए कोर्टात हजर करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!