🕒 1 min read
मुंबई : विधान परिषदेच्या निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींनी वेग घेतलाय. शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट असा संघर्ष टोकाला पोहचला आहे. शिवसेनेच्या सत्तेला पाठ दाखवत जवळपास ४६ आमदार बंड पुकारून गुवाहाटीत ठाण मांडून बसले आहेत. या सर्व घडामोडींवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी ट्विट केलं आहे.
सुजात आंबेडकर ट्विटमध्ये म्हणाले कि, प्रिय केशरी टूर्स गुवाहाटीध्ये काही कट्टर मराठी लोक अडकले आहेत. त्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. दुर्दैवाने तुम्हाला हेड काउंट देऊ शकत नाही, कारण आकडे दररोज बदलतात, असं ते ट्विटमध्ये म्हणाले. सुजात आंबेडकर यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आलं आहे. याआधी प्रकाश आंबेडकर यांनी देखील ट्विट करत सध्याच्या घडामोडींवर भाष्य केलं होत.
दरम्यान, ट्विटमध्ये प्रकाश आंबेडकर म्हणाले होते कि, एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे? असं ट्विट केलं होत. प्रकाश आंबेडकरांच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना वेगळं वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. आंबेडकरांच्या या ट्विटनंतर अद्याप भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
Dear @Kesari_Tours, we have a few staunch Marathi people stuck in Guwahati. Need your help to get them back to Maharashtra. Unfortunately cannot give you a head count, as the numbers change everyday. #MaharashtraLegislativeCouncil #MaharashtraPoliticalCrisis #MahaVikasAghadi
— Sujat Ambedkar (@Sujat_Ambedkar) June 24, 2022
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
