🕒 1 min read
औरंगाबाद : विविध कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या औरंगाबादच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना निलंबित करण्यात आले आहे. तसा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. शासनाने नावंदे यांच्या एकाधिकारशाहीस लगाम घालत चौकशी अहवालावर निर्णय दिला. तसेच त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी खेळाडू, क्रीडा संघटना आणि या कार्यालयात छळ सोसावा लागलेल्या अधिकारी, कर्मचारी यांनी समाधान व्यक्त करत शासनाचे आभार मानले आहेत.
२१ व्यायामशाळा साहित्य व क्रीडांगण विकास अनुदान वाटपात अनियमितता
जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्या कार्यकाळात २१ व्यायाम शाळा, साहित्य व क्रीडांगण विकास अनुदान या योजना राबविताना अनियमितता आढळून आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ च्या नियम ४ (१) (अ) अन्वये अधिकाराचा वापर करत नावंदे यांचे निलंबन करण्यात आले आहे.
या आदेशानुसार नावंदे यांना क्रीडा उपसंचालक यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. महाराष्ट्र नागरी सेवा (पद अधिग्रहण अवधी, स्वियेत्तर सेवा ) निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे (नियम १९८१ मधील कलम ६८ नुसार नावंदे यांना निलंबन निर्वाह व इतर भत्ते दिले जातील.
अखेर औरंगाबादच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे निलंबित! #Aurangabad #कवितानावंदे pic.twitter.com/o8oG91PtRG
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) June 24, 2022
तसेच निलंबन काळात कविता नावंदे यांना इतर खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही, असे आढळून आल्यास हे भत्ते मिळणार नाहीत. तशा आशयाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असले, असे महाराष्ट्र शासनाचे उपसचिव सुनील हंजे यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
