इंग्लंड : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात केली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. मात्र, यानंतर 26 धावांच्या आत टीम इंडियाने तीन गडी गमावले.
रोहित, शुबमन आणि चेतेश्वर पुजारा यांना लवकर बाद केल्यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली होती. भारतीय संघाच्या तीन विकेट 88 धावांवर घेतल्या होत्या. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी पुढाकार घेतला. कोहली आणि रहाणेने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा धैर्याने सामना केला. इंग्लंडचा कर्णधार मायकेल वॉन त्याच्या फलंदाजीमुळे खुश आहे. त्याने भारतीय फलंदाजांचे कौतुक केले आहे.
वॉनने ट्विट केले की, ‘साऊथॅम्प्टनमध्ये 225 चा स्कोर चांगला दिसत आहे. या परिस्थितीत भारतीय संघाने आतापर्यंत चांगला खेळ दर्शविला आहे. वॉन नेहमीच भारतीय संघावर आपले मत व्यक्त करताना दिसतो त्यामुळे तो नेहमीच चर्चेत राहतो. वॉनने अनेकदा टीम इंडियाला लक्ष्य केले आहे. डब्ल्यूटीसी फायनलच्या पहिल्या दिवशी (शुक्रवारी) त्यांनी ट्विट केले होते की हवामानाने टीम इंडियाला वाचवले. त्यांच्या या ट्विटनंतर भारतीय चाहत्यांनी त्याचा वर्ग लावला होता.
या सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे रद्द झाला होता. साऊथॅम्प्टनमध्ये मुसळधार पावसामुळे नाणेफेकदेखील शक्य झाले नाही. दुसर्या दिवसापासून सामना सुरू झाला. दुसर्या दिवशी डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यास सुरुवात झाली परंतु खराब प्रकाश पडल्यामुळे खेळ लवकर बंद करावा लागला. दुसर्या दिवशी केवळ 64.4 षटके खेळली जाऊ शकली. स्टंपपर्यंत टीम इंडियाने 3 गडी गमावून 146 धावा केल्या. विराट कोहली 44 आणि अजिंक्य रहाणे 29 धावांवर नाबाद आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेचे खोतकर केंद्रीय मंत्री दानवेंवर पडले भारी! ‘त्या’ पाच पोलिसांचे निलंबन मागे
- ‘दोन पक्षांच्या कुबड्यावर धंदा चाललाय आणि दिल्ली जिंकल्याच्या बाता करताहेत’
- महाविकास आघाडी किती दिवस टिकणार? उद्धव ठाकरेंनी दिले रोखठोक उत्तर
- ‘ममतांचे कौतुकच, कारण त्यांनी सत्तेसाठी युती मोडत विश्वासघात नाही केला’, भाजपचा शिवसेनेला टोला
- विरोधकांच्या टीकेनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय! म्हणाले, ‘मी लवकरच घराबाहेर पडणार आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
