मुंबई : शिवसेना पक्षाला आज ५५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फेसबुकद्वारे राज्यातील शिवसैनिकांशी संवाद साधला. भाषणाच्या सुरुवातीलाच हे भाषण करताना, समोर जल्लोष करणारे शिवसैनिक नसल्याने हा संवाद मला भाषण वाटत नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाकाळात घरात राहूनच राज्यकारभार करत आहेत. ते घराबाहेर पडतच नाहीत, अशी टीका सातत्याने विरोधकांकडून होत आहे. विरोधकांच्या म्हणजेच भाजपच्या याच टीकेला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलेय. या कार्यक्रमात बोलायला सुरुवात करतानाच त्यांनी सांगितले कि, ‘मी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणून नाही तर शिवसैनिक उद्धव ठाकरे म्हणून बोलत आहे, मुख्यमंत्रिपदाची झूल बाजूला ठेवून मी आज बोलतोय.
विरोधक सातत्याने माझ्यावर घराबाहेर पडत नाही, घरातून कारभार करत आहेत म्हणून टीका करतायत. त्यांना मला सांगायचं आहे की, घरातून काम करतोय तर एवढं काम होतंय, मग बाहेर पडलो तर विचार करा किती काम होईल. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मी सातत्याने जनतेला आवाहन करत आहे की, घरातून बाहेर पडू नका, घरातच राहा आणि मीच घराबाहेर पडतोय हे मला बरोबर वाटत नाही. पण मी लवकरच बाहेर पडणार आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
भाजपचा जीव कासावीस झालाय
शिवसेना आता पहिल्यापेक्षा बलवान झाली आहे. शिवसेनचे काम बघून अनेकांची पोटदुखी सध्या वाढली आहे. तसेच सत्ता गेल्यानं भाजपचा जीव कासावीस झाला आहे, परंतु त्यांच्या दुखण्याला इलाज करायला मी काही डॉक्टर नाही पण राजकीय औषध त्यांना नक्कीच पाजेल.’ असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला.
महत्त्वाच्या बातम्या
- दुसऱ्या लाटेमुळे देशाचे दोन लाख कोटींचे नुकसान, आरबीआयचा अंदाज
- बांग्लादेशच्या लढ्यात मोदी कोणत्या तुरुंगात होते? पंतप्रधान कार्यालयाने दिले ‘हे’ उत्तर
- ‘अनलॉकमध्ये गर्दी वाढत आहे, काळजी घ्या’, केंद्रीय सचिवांच्या राज्यांना सुचना
- ‘स्वत:ला सांभाळा नाहीतर तुमच्या वाटेला कधी शिवथाळी येईल हे समजणारही नाही’
- बीडमध्ये सध्या आंदोलनाचे वारे; आता २१ जूनला ‘रास्ता रोको’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
