पुणे : मनसेचे कट्टर समर्थक आणि निष्ठावान नेते अशी जनमानसात ओळख असलेले वसंत मोरे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदीच्या भोंग्यावर आणि मुस्लिम मदरश्यांवर आक्रमक भूमिका घेतली होती. भोंगे काढले नाहीत तर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याचा आदेश ही राज ठाकरेंनी दिला. यांनतर अनेक मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा स्पीकरवर लावले होते. मात्र पुणे मनसे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या या आदेशचं पालन करण्यात असमर्थता दर्शवली होती.
वसंत मोरे म्हणाले, “आपली प्रभागात अडचण होत आहे. कात्रज – गोकुळनगर भागात मुस्लिम मते निर्णायक आहेत. २०१७ मद्ये अडीचशे मतांनी आपण निवडून आलो होतो. यामुळे निर्णायक मतांची नाराजी ओढून घेणे अडचणीचं ठरणार आहे.”
दरम्यान राज ठाकरे यांच्या ९ तारखेच्या सभेसाठी वसंत मोरे यांना निमंत्रण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच मोरे यांनी पक्षाचा व्हाट्स अँप ग्रुप सोडल्याचे बातम्या आले आहेत. वसंत मोरे नाराज असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. मोरे हे राष्ट्रवादीत जातील अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या :
“कोरोनाची लाट पुन्हा येऊ नये, यासाठी…”, अजित पवारांचे सूचक वक्तव्य
“तुम्ही काय Xपटलं, तुम्ही काय कापलं सांगा”?; संजय राऊतांचा फडणवीसांना टोला
कोरोनाच्या “या” नव्या व्हेरिएंटबाबत चिंता करायची गरज नाही – राजेश टोपे
राज ठाकरेंनी भूमिका बदलू नये.. मोरे, बाबर यांच्यापेक्षा हिंदुत्व महत्वाचं’ – आनंद दवे
“किणी खून प्रकरणात बाळासाहेबांना कुठे-कुठे जावे लागले हे…”, जितेंद्र आव्हाडांचे ‘मनसे’ला प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

