🕒 1 min read
मुंबई : राज्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असून आता विविध प्रकारच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. नुकत्याच ग्रामपंचायती निवडणूक पार पडल्या. या निवडणुकांसाठी देखील मनसेने रणनीती आखली होती. आता येत्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने जय्यत तयारी सुरु केली आहे.
दोन आठवड्यांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची महत्वपूर्ण बैठक पार पडली होती. यानंतर, आज पुन्हा एकदा राज्यभरातील प्रमुख नेत्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मनसेची बैठक झाली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभयंकर, गजानन काळे, यांच्यासह अनेक नेते या बैठकीला उपस्थित आहेत. तर, बैठकीला राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे व स्नुषा मिताली ठाकरे या देखील उपस्थित राहिल्या आहेत.
मिताली ठाकरे यांच्या उपस्थितीवरून युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी मनसेला लक्ष्य केलं आहे. कोरोना काळात ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ या घोषवाक्यावरून मनसेने महाविकास आघाडी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. आता वरुण सरदेसाई यांनी मनसेला त्यांच्याच टीकेचा आधार घेत निशाणा साधला आहे.
” ‘शॅडो’ चे पण ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’,” असं ट्विट करत सरदेसाईंनी एकाच टीकेतून मिताली ठाकरे यांची पक्ष बैठकीला असलेली उपस्थिती व वर्षभरापूर्वी मनसेने राज्य सरकारवर लक्ष ठेवण्यासाठी निर्माण केलेलं स्वतंत्र शॅडो कॅबिनेट यावर मनसेला टोला लगावला आहे.
'शॅडो' चे पण 'माझे कुटुंब – माझी जबाबदारी' https://t.co/yiRXFxnbcS
— Varun Sardesai (@SardesaiVarun) January 29, 2021
महत्वाच्या बातम्या –
- ‘समान गुण असूनही प्रवेश मिळण्यास अडचण’, साष्टपिंपळगावच्या विद्यार्थ्यांची खंत
- ‘महाराष्ट्र देशा’ थेट साष्टपिंपळगावात, मराठा आरक्षण आंदोलनाच्या ठिणगीचे मशालीत रुपांतर
- ‘तुम्ही कितीही सत्तेचा माज दाखवा पण ते शेतकरी आहेत तुमचा माज उतरवूनच जाणार’
- मुंबईकरांवर लोकल प्रवासासाठी वेळेचं बंधन; मनसेची खोचक टीका
- धनश्री काडगावकरच्या घरी चिमुकल्याचे आगमन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

