🕒 1 min read
मुंबई : केद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशातील अन्नदाता गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीत आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी बसला आहे. या आंदोलनाची धग देशभरात पोहचत असताना प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलनाची धार काहीशी कमी होताना दिसत होती.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला शेतकऱ्यांना हटवून सीमा मोकळ्या करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आंदोलन संपणार अशी शक्यता वर्तवली जात होती. गाझीपूर सीमेवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात झाला. त्यांनी तंबू, शौचालयं हटवण्याचं काम सुरू केलं. भारतीय किसान युनियनच्या राकेश टिकेत यांनी आंदोलन संपवत असल्याचे संकेत दिले होते. तर लाल किल्यातील हिंसाचाराचा निषेध करत दोन शेतकरी संघटनांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यामुळे शेतकरी आंदोलन संपणार अशी चिन्हं दिसू लागली. मात्र गेल्या काही तासांत चित्र पूर्णपणे पालटलं आहे.
मात्र, रात्री उशिरा पोलिसांनी टिकेत यांना समजवण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यांनी आंदोलनस्थळ सोडण्यास नकार दिला. माध्यमांशी संवाद साधताना टिकेत यांना अश्रू अनावर झाले. शेतकऱ्यांसोबत विश्वासघात झाला आहे. तिन्ही कायदे मागे न घेतल्यास आत्महत्या करेन, असा इशाराच त्यांनी दिला. त्यानंतर टिकेत यांनी उपोषण सुरू केलं. यानंतर आंदोलनस्थळावरील परिस्थिती बदलली. राकेश टिकेत यांचे बंधू नरेश टिकेत यांनी आंदोलन संपणार नसल्याची घोषणा मुझफ्फरपूरमध्ये केली.
त्यानंतर रातोरात पश्चिम उत्तर प्रदेश, हरयाणाच्या अनेक गावांतील हजारो शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेऊन गाझीपूर सीमा गाठली. सीमेवरील परिस्थिती बदलताच पोलिसांचा पवित्रादेखील बदलला. त्यांना कारवाईला स्थगिती दिली. याशिवाय खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा पूर्ववत केला गेला. गेल्या काही तासांत गाझीपूर सीमेवरील वातावरण पूर्णपणे बदललं आहे.
या सर्व प्रकारावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘केंद्र सरकारने कितीही सत्तेचा माज दाखविला तरी त्यांनी एक लक्षात ठेवावे ते शेतकरी आहेत. ते तुमचा उद्दामपणा खपवून घेणार नाहीत. आंदोलन मागे घेणार नाहीत तुम्ही वारंवार प्रयत्न करा आंदोलन मोडण्याचे, पण ते तुमचा माज उतरवूनच राहणार. ‘अब इन्कलाब होगा’… जय किसान’ असा घणाघात तुपकर यांनी केला आहे.
केंद्र सरकारने कितीही सत्तेचा माज दाखविला तरी त्यांनी एक लक्षात ठेवावे ते शेतकरी आहेत..ते तुमचा उद्दामपणा खपवून घेणार नाहीत..आंदोलन मागे घेणार नाहीत तुम्ही वारंवार प्रयत्न करा आंदोलन मोडण्याचे….पण ते तुमचा माज उतरवूनच राहणार.. "अब इन्कलाब होगा"… जय किसान#ghazipurborder pic.twitter.com/6ZMusM9eMk
— Ravikant Tupkar (@Ravikanttupkar1) January 29, 2021
महत्वाच्या बातम्या
- कोरोना : सरकारकडून नवीन गाईडलाईन्स जारी, तर राज्यात २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन कायम !
- भाविकांना दिलासा, तुळजाभवानी मंदिरात ३० हजार दर्शन पास
- तुमच्या हिम्मतीला सलाम करतो, बच्चू कडू उतरले राकेश टिकेत यांच्या समर्थनात !
- इतिहासात पहिल्यांदाच रद्द झाली नळदुर्गची खंडोबा यात्रा
- खळबळजनक! खा.जलील 100 कोटींहून अधिकचा घोटाळा उघडकीस आणणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

