🕒 1 min read
मुंबई : झी मराठी’ वरील प्रसिद्ध मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ याच्यातील नंदिता घराघरांत पोहोचलेली अर्थात छोट्या पडद्यावरच्या वहिणीसाहेब अभिनेत्री धनश्री काडगावकर हिच्या घरी नुकतंच चिमुकल्याचे आगमन झाले आहे. या वहिणीसाहेब आता आई झाल्या आहेत. धनश्रीने ही गोड बातमी आपल्या इंस्टग्राम अकाउंट वरून चाहत्यांना सांगितली आहे. धनश्रीने गुरुवारी सकाळी मुलाला जन्म दिला.
https://www.instagram.com/p/CKl2mDth7am/?utm_source=ig_web_copy_link
अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने काही महिन्यांपूर्वी एक खास व्हिडिओ शेअर करत प्रेग्नंट असल्याची बातमी धनश्रीने दिली होती. कुणीतरी येणार येणार गं… पतीच्या बर्थडेच्या दिवशी धनश्रीने ही गोड बातमी समाजमाध्यमांवर शेअर केली होती. त्यानंतर तिची अधिक चर्चा सुरु झाली होती.
https://www.instagram.com/p/CKAz-0IBAcY/?utm_source=ig_web_copy_link
धनश्री काडगावकर हिने आपला आनंद शेअर करत एक फोटो इन्स्टावर पोस्ट केला आहे. ‘आमचा आनंद तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. गुरुवारी सकाळी मी मुलाला जन्म दिला. माझी आणि बाळाची दोघांचीही प्रकृती चांगली आहे, असे तिने म्हटले आहे.
https://www.instagram.com/p/CJ1NrAjBjvb/?utm_source=ig_web_copy_link
महत्वाच्या बातम्या
- ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘ती’ आक्षेपार्ह पोस्ट शेअर करायला नको होती’
- शेतकरी आंदोलनात फूट पडल्यामुळे या लढ्याला काही अर्थ उरला नाही : नरेश टिकैत
- ऑस्ट्रेलियामधील वर्णभेद घटनेनंतर इंग्लंडने उचलले ‘हे’ मोठे पाऊल
- सलग चौथ्या वर्षी मालमत्ता करवाढ न करण्याचा आयुक्ताचा निर्णय
- ‘मी राहुल गांधींची होणारी पत्नी…’ महिलेचा विमानतळावर गोंधळ !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

