Share

‘समान गुण असूनही प्रवेश मिळण्यास अडचण’, साष्टपिंपळगावच्या विद्यार्थ्यांची खंत

Published On: 

🕒 1 min read

जालना : समान गुण असून देखील मराठा समाजातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेशासाठी अडचणी येतात. शेतकरी कुटुंबातील मुले महाविद्यालयाची भरभक्कम फिस भरू शकत नाही. अशा परिस्थितीत शिक्षण सोडून देण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरत नाही. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांना आरक्षणाची आवश्यकता असल्याचे मत साष्टपिंपळगावातील वैभव औताडे या तरुणाने व्यक्त केले.

मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव गावात गेल्या दहा दिवसांपासून राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू आहे. आरक्षणासाठी आता 26 जानेवारीपासून बेमुदत उपोषण देखील सुरू करण्यात आले आहे. येथील ग्रामस्थांनी शिक्षणावरही बहिष्कार टाकला आहे. याबाबतची इत्यंभूत माहिती जाणून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र देशा’ची टीम थेट साष्टपिंपळगाव येथे पोहोचली आहे.

वैभव हा औरंगाबाद येथील सरस्वती भुवन महाविद्यालय बीएससी प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहत असतानाच शिक्षणाची वाट धरणाऱ्या वैभवकडे उच्च शिक्षणासाठी लागणारा पैसा नाही. अशा परिस्थितीत त्याच्यासोबतच असणाऱ्या इतर विद्यार्थ्यांना कमी पैशांमध्ये महाविद्यालय प्रवेश मिळतो. या अडचणी समस्त मराठा समाजातील युवकांचे आहेत.

त्या सोडवायच्या असल्यास आरक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे अशी मागणी वैभव याने केली आहे. शिक्षणात आणि नोकरीमध्ये आरक्षण असेल तरच मराठा समाजातील विद्यार्थी उज्वल भविष्याकडे वाटचाल करतील असे मतही गावातील विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!