🕒 1 min read
जालना : मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव गावात गेल्या दहा दिवसांपासून राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू आहे. आरक्षणासाठी आता बेमुदत उपोषण देखील सुरू आहे. येथील ग्रामस्थांनी शिक्षणावरही बहिष्कार टाकला आहे. याबाबतची इत्यंभूत माहिती जाणून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र देशा’ची टीम थेट साष्टपिंपळगाव येथे पोहोचली आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांसोबत ‘महाराष्ट्र देशा’ने संवाद साधला. गुरुवारी या ठिकाणी मशाल पेटली आहे. या ठिकाणाहून आता ५२२ गावांत मशाल पेटवून नेल्या जाऊन त्या-त्या गावांमध्ये उपोषण करण्याचा आक्रमक पवित्रा आता मराठा समाजाने घेतला आहे.
या उपोषणाच्या चौथ्या दिवशी देखील प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय. सरकारी यंत्रणा अजूनही जागी झालेली नाही. मराठा समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळतोय. अनेक ठिकाणाहून पाठिंबा मिळतोय. मात्र असे असले तरी राज्य सरकार अद्याप या आंदोलनाची दखल घेण्यास तयार नाही. या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. गावातील सर्व नागरिक या आंदोलनासाठी एकत्र आलेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाठिंबा असून देखील राज्य सरकार अद्याप दखल घेण्यास तयार नाही. याबाबत इथल्या ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. आंदोलनाची व्याप्ती पाहता प्रसारमाध्यमांनी देखील याची दखल अधिक घ्यायला हवी असे देखील इथल्या ग्रामस्थांनी सांगितले.
आरक्षणाअभावी मराठा समाजाचे गरीब कुटुंबातील तरुण-तरुणींचे हाल होत आहेत. आरक्षण मिळण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार चालढकल करत आहे. शांततेने मोर्चे काढूनही समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी साष्टपिंपळगाव हे अख्खे गावच उपोषणाला बसले आहे. यामुळे या गावचे हे आंदोलन संपूर्ण देशात गाजत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘ती’ आक्षेपार्ह पोस्ट शेअर करायला नको होती’
- शेतकरी आंदोलनात फूट पडल्यामुळे या लढ्याला काही अर्थ उरला नाही : नरेश टिकैत
- ऑस्ट्रेलियामधील वर्णभेद घटनेनंतर इंग्लंडने उचलले ‘हे’ मोठे पाऊल
- सलग चौथ्या वर्षी मालमत्ता करवाढ न करण्याचा आयुक्ताचा निर्णय
- कोकणामध्ये भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष करणार; निलेश राणेंची सिंहगर्जना


