मुंबई : 1 फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सर्वांसाठी खुली करण्यात येणार असल्याचं, राज्य सरकारनं सांगितलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसोबत इतर काही लोकांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली होती. पण सर्वसामान्य माणसांना मात्र परवानगी देण्यात आलेली नव्हती. आता मात्र गर्दी होणार नाही अशा वेळा आखून मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी सर्वसामान्यांना देण्यात आली आहे.
लोकल प्रवासासाठी परवानगी नसल्याने प्रवास करताना सामान्य मुंबईकरांचे हाल होत होते. बेस्टमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा धोका अधिक असून चाकरमान्यांना आर्थिक भूर्दंड देखील सहन करावा लागत असल्याने मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आंदोलन देखील पुकारलं होतं. आता राज्य सरकारने मुंबईकरांना लोकल प्रवासाची मुभा दिली असून वेळेचं बंधन घालण्यात आलं आहे.
गर्दीची वेळ सोडून म्हणजेच सकाळी ७ च्या अगोदर, नंतर दुपारी १२ ते ४ दरम्यान आणि रात्री ९ नंतर, अशा मर्यादित कालावधीतच प्रवास करता येणार आहे. यावर संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. ‘मूर्ख सरकारचं ऐकू नका.’ असं म्हणत ‘नागरिकांनी बिनधास्त प्रवास करावा,’ असं आवाहन त्यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘समान गुण असूनही प्रवेश मिळण्यास अडचण’, साष्टपिंपळगावच्या विद्यार्थ्यांची खंत
- ‘महाराष्ट्र देशा’ थेट साष्टपिंपळगावात, मराठा आरक्षण आंदोलनाच्या ठिणगीचे मशालीत रुपांतर
- “भारताला भारतात नमविणे कठीणच”
- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी 50 लाख रुपयांचे अनुदान; मुख्यमंत्र्यांची घोषणा
- ‘राज्य सरकारने साष्टपिंपळगावात मंत्रिमंडळ बैठक घ्यावी’, आंदोलकांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

