Share

गांधींबाबत अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण यांना ‘गोडसे-आपटे भारतरत्न’ पुरस्कार; हिंदू महासभेनं केलं सन्मानित!

Published On: 

🕒 1 min read

ग्वालियर : महात्मा गांधीजींच्या हत्येला काल ७४ वर्षे पूर्ण झाली. त्याचनिमित्ताने काल देशभरात महात्मा गांधीना अभिवादन करण्यात आले. मात्र महात्मा गांधींबाबत अपशब्द वापरणारे कालीचरण यांचा हिंदू महासभेकडून गौरव करण्यात आला. तसेच त्यांना ‘गोडसे-आपटे भारतरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.

हिंदू महासभेच्या वतीने गांधी हत्येतील आरोपी नथुराम गोडसे आणि नारायण आपटेला अभिवादन केले गेले. काल महासभेने गोडसे-आपटे स्मृति दिवस साजरा केला.

गेल्या महिन्यात हरिद्वार येथे पार पडलेल्या धर्म संसदेत वादग्रस्त विधान केलेल्या कालीचरण महाराज यांना ‘गोडसे-आपटे’ भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. तसेच महासभेच्या इतर चौघांना देखील हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. महात्मा गांधी यांच्या विरुद्ध अपशब्द वापरल्याप्रकरणी कालीचरण यांना १९ जानेवारी रोजी ठाणे पोलिसांनी मध्य प्रदेशमधून अटक केली होती.

अखंड भारताच्या स्वप्नासाठी महासभेने काल भारतमातेची आरती केली. हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जैवीर भरतद्वाज म्हणाले, ३० जानेवारी हा आम्ही गोडसे-आपटे स्मृतिदिवास पाळत आहोत, त्या माध्यमातून आम्ही ३० जानेवारी १९४८ रोजी त्यांना झालेल्या अटकेचा राग व्यक्त करीत आहोत.

भारतद्वाज यांनी भारताच्या फाळणीला महात्मा गांधी जबाबदार आहेत, असे वक्तव्य केले. तर फाळणीमुळे लाखों हिंदू मारले गेल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना भारद्वाज यांनी, हिंदू महासभेने भारतीय स्वतंत्र लढ्यात मोठे योगदान दिल्याचा दावा केला. पुढे बोलताना ते म्हणाले, लोकांनी आपल्याला चरख्यामुळे स्वतंत्र मिळाले या फसवणुकीत राहू नये, महासभा स्वतंत्र युद्धातील सर्व वीरांना अभिवादन करते.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!