मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सामने बघायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी काहीही झाले तरी महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही, असा दावा केला. तद्पश्चात आता राऊत यांच्या या टीकेवर भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. तसेच तुमच्या शापाने कावळाही मरणार नाही’, असा खोचक टोला भातखळकरांनी राऊतांना लगावला आहे.
कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. तुमच्या शापाने कावळाही मरणार नाही. pic.twitter.com/viWh5rR0kP
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 31, 2022
दरम्यान, भाजपने स्वत:च अंधाऱ्या विहिरीत उडी मारली असून त्यांचा पक्ष जागतिक स्तरावरचा पक्ष आहे. उद्या ब्रिटनचा पंतप्रधान त्यांचा माणूस होईल, व्हाईट हाऊसमध्ये त्यांचा पंतप्रधान असेल. परंतु काहीही झाले तरी महाराष्ट्रात त्यांचा मुख्यमंत्री होणार नाही. तसेच पुढे जवळपास २५-३० वर्ष महाराष्ट्रात त्यांची सत्ता येणार नाही आणि तोपर्यंत भाजप राहिल की नाही माहीत नाही, असे राऊत म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या:
“अशोक गर्ग MAGPIE ग्रुपने संजय राऊत कुटुंबाला भागीदारी दिली?”, किरीट सोमय्य्यांचा सवाल
“अमृता फडणवीसांना वर्षा बंगला सोडावा लागल्यामुळे त्या फ्रस्टेशनमध्ये”, मनीषा कायंदेंची टीका
“केवळ महसुलासाठी मद्य विक्रीला प्राधान्य देणे हे जनतेचं दुर्दैव”, अण्णांनी साधला ‘मविआ’वर निशाणा
आ. नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक पोलिसांना शरण; राणेंवर अटकेची टांगती तलवार
“नथुराम गोडसेची विचारधारा…” ; तुषार गांधींची वेदनादायक प्रतिक्रिया


