Share

“…मग आशिष शेलार आणि अतुल भातखळकरांना गुजरात पेंग्विन म्हणायचे का?”, किशोरी पेडणेकरांचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: सध्या राणीच्या बागेतील पेंग्विनवरील खर्चावरून भाजपने महापालिकेला चांगलेच धारेवर धरले आहे. यावरूनच महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी आदित्य ठाकरेंना युवराज, पेंग्विन म्हणता, मला चित्रा वाघ यांनी पेंग्विनकर असे आडनाव दिले आहे. मग आशिष शेलार (Ashish Shelar) आणि अतुल भातखळकरांना (Atul Bhatkhalkar) गुजरात पेंग्विन म्हणायचे का? असा सवाल करत भाजपवर टीका केली आहे.

दरम्यान आता गुजरातमध्येही पेंग्विनचे आगमन झाले असून, महापौर किशोरी पेडणेकर यांनी अहमदाबादमधील पेंग्विन प्रकल्पाला भेट दिल्यानंतर पेंग्विनवर झालेला खर्च, त्या प्रकल्पाच्या खर्चाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी निशाणा साधत आशिष शेलार आणि अतुल भातखळकरांना गुजरात पेंग्विन म्हणायचे का? असा सवाल केला.

तसेच अहमदाबाद येथील प्रकल्पाला भेट दिल्यानंतर त्यांनी म्हटले की,’या पार्कमध्ये एकूण पाच पेंग्विन असून सिमॉन, पुंबा, नेमो, मुशू आणि स्वेन अशी त्यांची नावे आहेत. ही सर्व नावे आफ्रिकन आहेत. तसेच गुजरातमध्ये प्रत्येक प्राणी पाहायला वेगवेगळे शुल्क आकारले जाते. मात्र मुंबईच्या राणीबागेत २५ ते ५० रुपये शुल्क घेऊन संपूर्ण राणीबागेत फिरता येते. सर्व प्राणी पाहता येतात. असच आम्ही इथे पैसे वाढवले तर लगेच गळा काढतील असा टोलाही किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!