यवतमाळ : लस उत्पादनाची क्षमता कमी असली तरी सिरम इंस्टीट्यूटला लागणाऱ्या कच्च्या मालाचा रोखला गेलेला पुरवठा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकीय मुत्सद्दीपणातूनच पुर्ववत झाला. अमेरिकेला क्लोरोक्विंन औषधांचा पुरवठा केला होता. त्यामुळे आता अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी भारताला मदतीचा हात पुढे केला. त्यातूनच अन्य राष्ट्रांनीही भारताकडे मदतीचा ओघ सुरू केल्याचा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केला. यवतमाळ दौऱ्यावर असताना ते बोलत होते.
फडणवीस यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी कोरोना नियंत्रणाचा आढावा घेतला. ‘अर्ली टेस्टींग, अर्ली ट्रिटमेंट’ या सुत्रानुसार आरोग्य यंत्रणेने काम केल्यास कोरोनावर तातडीने नियंत्रण येईल. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांच्या चाचण्या वाढवा, तसेच तातडीने उपचार पुरविण्याचा सल्ला त्यांनी दिला. जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णवाढीचा दर वाढला आहे. मृत्यूदरही अनियंत्रीत झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी जिल्ह्यात भेट दिली. आढावा बैठकीत त्यांनी कोरोना नियंत्रणावरील उपाययोजनांची माहिती घेतली.
बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, पुण्यातील सिरम इंस्टिट्यूटला लस उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल रोखण्यात आला होता. मात्र यामध्ये पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी चर्चा करून हा तिढा सोडविला. यापूर्वी अमेरिकेला क्लोरोक्विंन सारख्या औषधांचा पुरवठा करून मोदींनी राजकीय मुत्सद्दीपणा दाखविला होता. त्यामुळे जो बायडेन यांनी भारताला सर्व प्रकारच्या मदतीची ग्वाही दिल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. लसीकरणासह अस्थायी डॉक्टरांना कायम करण्याच्या मुद्द्यावरही त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : देशातील दीडशे जिल्ह्यांत कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता
- बॉलीवूडचा सिंघम अजय देवगण दादरमध्ये उभारणार कोव्हिड सेंटर
- ‘आता जनतेने केंद्र सरकारविरोधात बंड पुकारले पाहिजे’
- मोठी बातमी; खेळाडु, समालोचकानंतर दोन पंचानी घेतली आयपीएल स्पर्धेतून माघार
- ‘नंदूरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी संस्थेला एक हजार रेमडेसिविर देणे धक्कादायक’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

