Share

कोरोनाच्या काळात स्पॉट बॉयच्या मदतीला धावुन आला स्वप्निल जोशी

Published On: 

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्व चित्रीकरण बंद झाले आहे. यामुळे चित्रपटसृष्टीतील अनेकांच्या हाताला काम नाही.

यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार स्वप्निल जोशीने मदतीचा हात पुढे केला आहे. लॉकडाऊनमुळे ज्या चित्रपट सृष्टीतील ज्या स्पॉट बॉयच्या हाताला रोजगार उपलब्ध नाही अशा गरजु स्पॉट बॉय आणि त्यांच्या कुटुंबीयाना रेशन किटचे वाटप करत मदत केली आहे. यावेळी स्वप्निल जोशी आणि सामाजिक कार्यकर्ते मॉरिस नोरोनहा दोघांनी मिळुन फिल्म इंडस्ट्रीमधील स्पॉट्स बॉयचे काम करणाऱ्या लोकांना १०० हून अधिक रेशन किटचे वितरण केले.

आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या स्वप्निल जोशीच्या या कार्याने त्याचे चाहते भारावुन गेले आहे. यावेळी स्वप्निल जोशीने त्याच्या चाहत्यांनाही गरजुंना मदत करण्याचे अवाहन केले आहे. यादरम्यान एप्रिल महिन्यात स्वप्निल जोशीचा प्रदर्शित होणार ‘बळी’ या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले गेले आहे. तसेच २०२० मध्ये आलेल्या समांतर या वेब सिरीजचा पुढील भागही लवकरच प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!