Share

पासपोर्ट जप्तीवर वडेट्टीवारांचा धक्कादायक खुलासा; म्हणाले, मी स्वतः ईडीकडे जाऊन…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हा नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असतात. आता विजय वडेट्टीवार हे पुन्हा एकदा चर्चेत आले असून यावेळी कारण देखील जरा वेगळे आहे.

विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. वडेट्टीवार यांच्यावर गुन्हे लपवल्याचा आरोप आहे. भाजपचे माजी आमदार मितेश भांगडिया यांनी तक्रार केली होती. त्यात त्यांनी विजय वडेट्टीवार यांनी आपल्यावर असणाऱ्या क्रिमिनल केसेस लपवल्या असल्याचा आरोप केला होता. याचमुळे त्यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आल्याचे वृत्त आज दिवसभर चर्चेत होते.

आता खुद्द विजय वडेट्टीवार यांनी याबाबत खुलासा केला आहे. ‘आजच्या तारखेच्या माझ्यावर कुठलीही केस नाही. २०१२ मध्ये शिक्षणासंबंधी चार किरकोळ प्रकारच्या केसेस होत्या. मी ईडी कार्यालयात जाऊन माझा पासपोर्ट स्वत: जमा केला. मी स्वतः व्हेरिफिकेशन करायला सांगितले. मी ओबीसीसाठी काम करीत आह, माझ्याकडे पक्षाची मोठी जबाबदारी येणार आहे, त्यामुळे मी पुढे जाऊ नये यासाठी विरोधक प्रयत्न करीत आहेत’ असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात लोकमतेने वृत्त दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!