🕒 1 min read
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अद्याप वर्षभराचा अवधी आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे नियोजन भाजपाने सुरू केल्याचे वृत्त आल्यापासून या निवडणुकीचा विषय राजकीय वर्तुळात ऐरणीवर आला आहे. आता, भाजप पाठोपाठ काँग्रेसने देखील आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळवता आलं. त्यामुळे एकीच्या बळाचा अनुभव आल्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी पुढील येणाऱ्या निवडणुका देखील एकत्रपणे लढवल्या जातील असा खुलासा केला होता. मात्र, आता स्थानिक पातळीवर होणाऱ्या मागणीमुळे महाविकास आघाडीत तणाव वाढण्याची चिन्हे आहेत.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी काँग्रेस स्वबळावरच लढेल असं स्पष्ट केलं आहे. तर खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी देखील मुंबईसह औरंगाबाद व कोल्हापूर महापालिकेतही स्वबळाबाबत तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र एकत्र लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
स्वबळावर लढण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले, ‘मुंबई महापालिका निवडणुकीत मित्र पक्षांसोबत आघाडी करुन पुढे जाण्याची राष्ट्रवादीची भूमिका आहे. शेवटी अंतिम निर्णय शरद पवार घेतील. आघाडी व्हावी, ही आमची मानसिकता आहे. मतांची विभागणी होऊ नये. नाही तर तुला ना मला, दे तिसऱ्याला असं होऊ नये. आघाडीबाबत मी सकारात्मक आहे,’ असं त्यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेच्या जोशी ‘सरां’ना नितीन गडकरींनी केला आदरपूर्वक वाकून नमस्कार
- CMO ट्विट : ‘संभाजीनगर’ उल्लेखावरून अजित पवारांना शंका; चौकशी होणार
- स्वदेशी Covaxin लसीच्या शेवटच्या ट्रायलबाबत महत्वाची बातमी !
- ‘भाजपला नामकरणावर बोलण्याचा आधिकार नाही, त्यांनी सत्तेत असताना काहीही केलं नाही’
- महाविकास आघाडी सरकार किती जणांचे आवाज दाबणर : राम कदम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
