Share

खा. प्रीतम मुंडे ऊसतोड कामगार पुत्राच्या मदतीसाठी मध्यरात्री आल्या धावून !

Published On: 

🕒 1 min read

बीड : ऊसतोड कामगार धम्मदीप अशोक सोनवणे राहणार नंदपुर कांबी, तालुका गेवराई यांच्या मुलाचा कर्नाटकमध्ये अपघात झाला होता. त्याला मनाली मलगड साखर कारखाना, कर्नाटक या ठिकाणी ऊसतोडणीसाठी गेलेले असताना पंधरा दिवसापूर्वी त्याला एसटी बसने उडवलं होतं.

त्याला पंधरा दिवसांपूर्वी विजापूर येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दररोज 10 ते 15 हजार रुपये खर्च लागत होता, आतापर्यंत दीड लाखाच्यावर खर्च झालेला होता. पैशाअभावी त्या मुलाचा पुढील उपचार त्या ठिकाणच्या डॉक्टरने थांबवले होते, अक्षरशः त्या मुलाच्या आई-वडील त्याठिकाणी उपाशी होते. अशावेळी त्या ऊसतोड कामगार असलेल्या सोनवणे यांनी बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना रात्री 12 वाजता फोन करून संपूर्ण व्यथा सांगितली.

प्रीतम मुंडे यांनी आपली तत्परता दाखवत लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊस तोड कामगार व मुकादम वाहतूकदार संघटना जिल्हाध्यक्ष कृष्णा तिडके यांच्याशी संपर्क साधला. त्यांना संपूर्ण मदत करण्याच्या सूचना दिल्या व संपूर्ण हॉस्पिटल बिल भरण्याची व्यवस्था देखील केली. कामगारांच्या कुटुंबाचा विमा भरलेला असल्याची व त्यांची संपूर्ण प्रक्रिया करून त्यांना आर्थिक मदत मिळवून कशी देता येईल याचीही व्यवस्था केली. अर्ध्यारात्री मदत करून ‘कुठलीही काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी आहे’ असे त्या अपघातग्रस्त उसतोड कुटुंबाला सांगितले. तेव्हा संकटात सापडलेल्या सोनवणे यांना गहिवरून आले व त्यांनींसुटकेचा निश्वास टाकत आसवांना वाट मोकळी करून दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!