Share

स्वदेशी Covaxin लसीच्या शेवटच्या ट्रायलबाबत महत्वाची बातमी !

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : कोरोनावर मात करण्यासाठी भारतात सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींना आपत्कालीन वापरासाठी संमती देण्यात आलेली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली होती.

कोवॅक्सिन ही लस पूर्णपणे स्वदेशी आहे. मात्र, या लशींवरून राजकारण देखील सुरु झाल्याची खंत भारत बायोटेकचे चेअरमन आणि एमडी डॉ. कृष्णा एल्ला यांनी व्यक्त केली होती. या दोन्ही लशींना परवानगी मिळाल्यानंतर स्वदेशी विरुद्ध विदेशी असा रंग देण्यात येत असल्याचे दिसून आले होते. या दोन्ही कंपन्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप देखील सुरु झाले होते.

कोव्हॅक्सिन या लसीला परवानगी देण्याआधी तिची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण न करताच परवानगी कशी दिली असा सवाल निर्माण झाला होता. दरम्यान, एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देशातील जनतेला आवाहन केले आहे की, करोना लसीवरील वाद योग्य नाही. संशय घेऊ नका. देशातील जनतेने नियामक संस्थांवर विश्वास ठेवावा, डाटाचा व्यापक अभ्यास केल्यानंतरच या लसीच्या वापरास परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, आता या स्वदेशी लसीबाबत आणखी एक दिलासादायक वृत्त आलं आहे. काही दिवसांतच लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलही पूर्ण झालं आहे आणि भारतासाठी ही खूप अभिमानास्पद बाब आहे. भारत बायोटेकनं तयार केलेली कोरोना लस कोवॅक्सिनचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे, अशी माहिती भारत बायोटेकनं दिली आहे. त्यामुळे आता सर्वांच्याच शंकेचं निरसन झालं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!