🕒 1 min read
कणकवली:- गेल्या दीड महिन्यापासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
सहा महिन्यांपूर्वी हे तीन कृषी सुधारणा कायदे झाले असताना, आता विरोधकांना जाग आली आहे व ते म्हणत आहेत की हे कायदे शेतकऱ्यांचं नुकसान करणारे आहेत, म्हणजे सहा महिने काय ते झोपा काढत होते का? एका राज्यातील मूठभर शेतकऱ्यांच्या मदतीने गेल्या ४० दिवसांपासून प्रामुख्याने दिल्ली व देश वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशभरात बाकी ठिकाणी कुठेही या कायद्याला विरोध नाही उलट समर्थन आहे. असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यास विरोध करणाऱ्यांवर आज टीका केली.
केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांच्या समर्थनार्थ कणकवली येथे आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार रविंद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितित भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. यावेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय पाहता 2024 च्या निवडणुकीमध्ये भाजप 400 चा आकडा क्रॉस करणार. काँग्रेसला मात्र एका बसमध्ये बसवून नेता येईल येवढेच खासदार मिळणार, असा दावा करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला डिवचलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेच्या जोशी ‘सरां’ना नितीन गडकरींनी केला आदरपूर्वक वाकून नमस्कार
- ना मला, ना धड तुला, दे तिसऱ्याला… स्वबळावर अजित पवारांची प्रतिक्रिया
- स्वदेशी Covaxin लसीच्या शेवटच्या ट्रायलबाबत महत्वाची बातमी !
- ‘भाजपला नामकरणावर बोलण्याचा आधिकार नाही, त्यांनी सत्तेत असताना काहीही केलं नाही’
- … म्हणून मंत्री विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
