Share

लातूर जिल्ह्यात लसीकरण ठप्प ?

Published On: 

लातूर: राज्यात तसेच जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने अनेक रुग्णालयांमध्ये आता वैद्यकीय सुविधांचा तुटवडा जाणवत होता. मात्र आता लासीचा देखील तुटवडा जिल्ह्यात जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून लस उपलब्ध होत नसल्याची ओरड नागरिकांतून होत आहे. लातूर जिल्ह्यात १७१ सेंटरवरून लसीकरण करण्याचे काम सुरू होते. मात्र, सध्या लस नसल्याने लसीकरण ठप्प झाले आहे. राज्यसरकार कडून २ लाख ३१ हजार डोस प्राप्त झाले होते. यापैकी २ लाख २० हजार ३६ डोस नागरिकांना दिले. आता केवळ ११ हजार डोस शिल्लक आहेत.

ज्या लसीकरण सेंटरवर लस उपलब्ध आहे, त्या ठिकाणी लसीकरण सुरू आहे. ज्या ठिकाणी लसच नाही, अशा सेंटरवरचे लसीकरण थांबले आहे. लसीची मागणी सरकारकडे केली आहे. येत्या तीन, चार दिवसांत लस येण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या तरी लसीचा तुटवडा भासत आहे. याशिवाय, नागरिकांतून लसीकरणाची मागणी होत आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव सर्वांसाठी धोकादायक ठरत असल्याने नागरिकांचा लसीकरणावर भर आहे. आता नागरिक लस घेण्यासाठी उत्सुक आहेत; पण लस उपलब्ध नाही.

जिल्हा प्रशासनाकडे आरोग्य विभागाने लसीची मागणी केली असून, प्रशासनानेही सरकारकडे लस मागणी केली आहे, असे सूत्रांनी सांगितले. सध्या लातूर जिल्ह्यातील मोजक्याच सेंटरवर लस थोडीबहुत शिल्लक असून, ती नागरिकांना देण्याची व्यवस्था सुरू आहे. कोरोना रूग्ण मोठ्या संख्येने वाढत असल्याने नागरिक लस घेण्यास पसंती देत आहेत. परंतु, लस घेणाऱ्यांची संख्या वाढल्याने लस पुरवठा त्या तुलनेत होत नाही. त्यामुळे गेल्या चार, पाच दिवसांपासून लसीकरण मोहीम थंडावली आहे. आता नव्याने लस प्राप्त झाल्यानंतरच लसीकरणास सुरूवात होईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.

लातूर जिल्ह्यासाठी १६ जानेवारी २०२१ रोजी २ लाख ३१ हजार लसीचे डोस प्राप्त झाले होते. आजवर आपण २ लाख १६ हजार ३६ डोस जिल्ह्यातील नागरिकांना दिले. लसीची मात्रा देण्याचे काम लातूर जिल्ह्यात १७१ केंद्रांवरून करण्यात आले असून, शुक्रवारी ४ हजार नागरिकांना डोस दिले. आता केवळ ११ हजार लसीचे डोस शिल्लक असून, शुक्रवारी (दि. २३) आरोग्य खात्याने जिल्हा प्रशासनामार्फत नव्याने ४ लाख ९५ हजार डोसची मागणी केली आहे. हे डोस एक महिन्यात देण्याच्या हिशेबाने मागविले असून, दररोज किमान १५ हजार नागरिकांना लस मिळावी, असे नियोजन केले आहे. सध्या शिल्लक असलेले ११ हजार डोस देण्याचे काम काही केंद्रांवरून सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!