Share

ग्रामस्थांचा पुढाकार; चिंचोली माळीमध्ये शुकशुकाट

Published On: 

बीड: कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. जिलहेत कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे तसेच मृत्यू दर देखील वाढला आहे. बीड जिल्हा कोरोनाच्या विळख्यात गेल्याचे इथे चित्र चिंतेत भर ताकत आहे. या वाढत्या कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र अद्याप परिस्थिति नियंत्रणात आलेली नाही. तसेच कोरोनाचा आता ग्रामीण भगत देखील शिरकाव झाल्याने मोठे संकट उभे राहिले आहे. जिल्ह्यातील चिंचोली माळी व सारुक वाडी या गावांत कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. वाढत्या रुग्ण संख्येची साखळी तोडण्यासाठी ग्रामपंचायतीने या दोन्ही गावात २३ एप्रिल ते १ मेदरम्यान आठ दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’ लागू केला. गावकऱ्यांनी घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन सरपंच सुनील देशमुख व ग्रामसेवक शिवाजी पटाईत यांनी केले आहे.

तहसीलदार दुलाजी मेंडके व गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे यांनी चिंचोली माळी व सारुक वाडी या गावाच्या ग्रुप ग्रामपंचायतीत बैठक घेऊन कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला ब्रेक देण्यासाठी जनता कर्फ्यू पाळण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ग्रामपंचायतीने या दोन्ही गावात २३ एप्रिल ते १ मेदरम्यान आठ दिवसांचा जनता कर्फ्यू लागू केला. या कालावधीत नागरिकांना विनाकारण गावात फिरता येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी बसता येणार नाही. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहतील. अंत्यविधी, आजारपणासाठी प्रवासाची मुभा राहील. लग्न समारंभासाठी २५ जणांना दोन तासांकरिता परवानगी असेल. अतिआवश्यक कारणासाठी घराबाहेर पडता येणार आहे. विनामास्क फिरताना आढळल्यास सक्तीने अँटिजन टेस्ट करण्यात येणार असून पॉझिटिव्ह आल्यास त्वरित विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येईल.

जनता कर्फ्यू कालावधीत नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई होईल. त्या व्यक्तीचे नावे तालुका दंडाधिकारी केज व पोलिस निरीक्षक पोलिस ठाण्याला कळवण्यात येणार आहेत. गावकऱ्यांनी घराबाहेर न पडता ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच सुनील देशमुख, उपसरपंच पवन पवार, ग्रामसेवक शिवाजी पटाईत यांनी केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!