Share

केकेआर विरुद्ध राजस्थान यांच्यात लढत; आयपीएलमध्ये दोन्ही संघ गुणतालीकेत सर्वात खाली

Published On: 

मुंबई : आज आयपीएलमध्ये मुंबईत वानखेडे मैदानावर गुणतालीकेत सर्वात खाली असलेले दोन संघ भिडणार आहे. कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघासाठी हा सामना जिंकणे पुनरागमनाच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे. दोन्ही संघानी आतापर्यंत ४ सामने खेळले असुन केवळ एका सामन्यात विजय प्राप्त केला तर तीन सामन्यात पराभव स्विकारला आहे.

राजस्थान संघाने आपला पहिला सामना पंजाब विरुद्ध गमावला. मात्र त्या सामन्यातील कामगिरी बघुन राजस्थान इतर संघाला चांगली टक्कर देईल असे वाटले. मात्र दिल्ली कॅपीटल्स विरुद्ध विजय वगळता. इतर दोन सामन्यात राजस्थान संघाने ज्या प्रकारे पराभव स्विकारला त्यामुळे संघाचे मानसिक खच्चीकरण होत आहे. कर्णधार संजुची बॅट सलामीच्या सामन्यानंतर शांत आहे. गोलंदाजीत कोणीही विशेष कामगीरी करु शकला नाही. मुख्य: राजस्थानच्या संघाची फंलदाजी ही केवळ डेव्हिड मिलर आणि जोस बटलर यांच्यावर अवलंबुन आहे.

तर दुसरीकडे केकेआरने जरी तीन सामने गमावले असले तरी त्यांची कामगीरी समिंश्र राहिली आहे. त्यात मुंबई विरुद्ध झालेल्या दारुण पराभवानंतर चेन्नई विरुद्ध पराभवातही त्यांनी ज्याप्रकारे लढा दिला. त्याचे सगळीकडे कौतुक होत आहे. केकेआरसाठी कर्णधार मॉर्गनचा फॉर्म चिंतेची बाब ठरत आहे. तर सलामीवीर मोठी भागिदारी करण्यात अपयशी ठरल्यामुळे मधल्या फळीतील फलंदाजावर दबाव येत आहे. गोलंदाजीत केकेआरची कामगीरी साधारण राहीली आहे. तेव्हा आजच्या सामन्यात कोणता संघ पुनरागमन करेल याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!