Share

एन. व्ही. रामण यांनी घेतली सरन्यायाधीश पदाची शपथ

Published On: 

नवी दिल्ली : देशाचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून एन.व्ही. रामण यांनी शपथ घेतली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्या. रामण यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. सरन्यायाधीश बोबडे निवृत्त झाल्याने वरीष्ठतेच्या आधारावर रामण यांची सरन्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

देशाचे सरन्यायाधीश निवृत्त होण्याआधीच सर्वात वरीष्ठ न्यायाधीशाची या पदासाठी शिफारस करतात. त्यानुसार न्या. बाेबडे यांनी न्या. एन.व्ही. रामण यांच्या नावाची शिफारस केली होती. शेतकरी कुटुंबात जन्म झालेले एन.व्ही.रामण यांचा साहित्य क्षेत्रातही रस आहे. त्यांचा जन्म २७ ऑगस्ट १९५७ रोजी तत्कालीन अविभक्त आंध्रप्रदेश राज्यात झाला आहे.

एन.व्ही. रामण यांनी आयुष्याच्या सुरूवातीला काही काळ पत्रकार म्हणूनही काम केलेले आहे. आंध्रप्रदेश उच्च न्यायालयात त्यांनी अनेक वर्ष न्यायदानाचे कार्य केले. जम्मू-कश्मीरमध्ये कलम ३७० कलम हटवल्यानंतर या ठिकाणची इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्यासंदर्भातल्या महत्त्वाच्या याचिकेची सुनावणी त्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!