Share

‘देवेंद्र फडणवीस चांगले मुख्यमंत्री होते, मात्र आता ते उतावीळपणा करतायत’

Published On: 

मुंबई : माजी आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरो हे अतिशय कडक आणि स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांनी मुंबईचे २१ वे आयुक्त म्हणून काम देखील पहिले आहे. त्यांच्या कामगिरीमुळे त्यांची केंद्रात सीआरपीएफचे महासंचालक म्हणून देखील नियुक्त करण्यात आले होते. दरम्यान, ज्युलिओ रिबेरो यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये लेख लिहिला आहे.

यामध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत भाष्य केलं असून सध्याच्या राजकारणावरून त्यांचे कान देखील टोचले आहेत. ‘देवेंद्र फडणवीस हे चांगले मुख्यमंत्री होते. मात्र सध्या मुख्यमंत्रिपदासाठी ते उतावीळ झाले असून, त्यांच्याकडून चुकीची पावलं टाकली जात आहेत. त्यांनी मुख्यमंत्री पदासह गृहमंत्रीपद देखील सांभाळलं आहे. त्यामुळे स्वतः कार्यकाळात गृहमंत्री म्हणून लागू केलेल्या कायद्याचा भंग करू नये,’ असं रिबेरो म्हणाले आहेत.

यासोबतच, राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून काळा बाजार मोठ्या प्रमाणात होत आहे. अशात भाजपने महाविकास आघाडीवर आरोप करत ब्रुक कंपनीमार्फत राज्यातील लोकांना रेमडेसिवीर इंजेक्शन देणार असल्याचे जाहीर केलं होतं. यानंतर, राजकीय आरोप-प्रत्यारोप चांगलंच तापलं होतं.

यावरून देखील यांनी भाजपला चांगलंच सुनावलं आहे. रिबेरो यांनी फडणवीसांना थेट कायदा दाखवत त्यांची चूक सांगितली आहे. ‘ब्रूक फार्माच्या मालकाला ताब्यात घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ते गृहमंत्री असताना केलेला नियमच मोडीत काढला. राज्याच्या सुव्यवस्थेचे आणि कायद्याचे प्रतिक असलेल्या पोलीस ठाण्यात जाणे, त्याठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांशी वाद घालणे, अधिकाऱ्यांची चढ्या आवाजात बोलणे या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीस यांच्या पदाला साजेशा नव्हत्या. फडणवीस यांनी त्यांचा संयम गमावला,’ असं ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!