Share

‘या’ जिल्ह्याच्या सीमा सील, आता प्रवासासाठी लागेल ई-पास

Published On: 

उस्मानाबाद: जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असल्याने रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार उस्मानाबाद जिल्याच्या सर्व आंतरजिल्हा व आंतरराज्य सीमा शुक्रवारपासून प्रवासासाठी बंद करण्यात आल्या असून, सर्व सीमांवर पोलिस तपासणी नाके कार्यरत करण्यात आले आहेत. या सीमा केवळ अत्यावश्यक कारणासाठी ओलांडता येतील.मात्र, त्यासाठी प्रवास पास बंधनकारक करण्यात आला आहे. ही ई- पास सुविधा महाराष्ट्र पोलीस दलाच्या https:/covid19.mhpolice.in/ संकेतस्थळावर, लिंकवर उपलब्ध आहे.

ज्यांना जिल्ह्याबाहेर किंवा जिल्ह्यात यायचे आहे, अशा गरजू अर्जदारांनी या लिंकवर जाऊन पाससाठी योग्य तो पर्याय निवडावा, असे आवाहन पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे. पोलिस दलाने दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्जदाराने आपले नाव व ओळखपत्र, पत्ता इ मेल आयडी, वाहन प्रकार व क्रमांक, प्रवासी संख्या,प्रवासाचो उद्देश,प्रवास प्रारंभ ठिकाण व प्रवासचे अंतिम ठिकाण, प्रवास मार्ग व दिनांक, परतीचा प्रवास मार्ग व दिनांक इत्यादी माहिती त्यात भरावी.

तसेच अर्जदाराचे छायाचित्र व आवश्यक कागदपत्रे (प्रत्येकी १ MB आकाराच्या आतील) इत्यादी माहीती भरुन अपलोड करुन तसा ऑनलाईन अर्ज संबंधित जिल्हा पोलीस दलास करावा. यानंतर अर्जकर्त्याला जिल्हा बंदी असताना पास उपलब्ध होईल. ई- पास सुविधा महाराष्ट्र पोलीस दलाच्या https:/covid19.mhpolice.in/ संकेतस्थळावर, लिंकवर उपलब्ध आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!