Share

‘डिसेंबरपूर्वी सर्वांचे लसीकरण, ही मोदी सरकारची लबाडीच’ ; ममता दीदींचा घणाघात

Published On: 

कोलकत्ता : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेली जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, देशातील राज्यांमध्ये लसींचा तुटवडा जाणवत आहे. लसीच उपलब्ध होत नसल्याने अनेक राज्यांनी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबवले आहे. केंद्र सरकारने, ‘जून महिन्याच्या मध्यापर्यंत लसी उपलब्ध होतील’ असे सांगितले आहे.

तर केंद्राने डिसेंबर पर्यंत देशात कासीकरण पूर्णत्वास नेहून दाखवणार असल्याचे सांगितला आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पुन्हा एकदा देशातील कोरोना लसीकरणावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी बोलताना बॅनर्जी यांनी, ‘डिसेंबर २०२१ पूर्वी देशातील सर्व नागरिकांना करोना विषाणूची लस देण्यात येईल, हा केंद्र सरकारचा दावा देखील लबाडीच आहे’ असा घणाघात केला.

‘डिसेंबर २०२१ पूर्वी देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचा केंद्र सरकारचा दावा ही देखील एक लबाडीचं आहे. ते केवळ निरर्थक व पोकळ दावे करत असतात. केंद्राने सर्व राज्यांना लसींचा मोफत पुरवठा करायला हवा.’ अशी मागणी देखील बॅनर्जी यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!