Share

चीनमध्ये आता तीन मुलांना जन्म देण्याची परवानगी, सरकारच्या निर्णयाचे नागरिकांनी केले स्वागत

Published On: 

बिजिंग : चीन सरकारकडून आता जोडप्यांना तिसऱ्या मुलाच्या जन्मासाठीही परवागनी देण्यात येणार आहे. अवाजवी कुटुंब नियोजनामुळे चीनमध्ये युवा नागरिकांची संख्या घटल्याचा धसका चिनी सरकारने घेतला आहे. चीन हा म्हाताऱ्यांचा देश म्हणून गणला जाऊ नये यासाठी आता जिनपिंग सरकारने प्रत्येक दांपत्याला 3 मुले जन्मास घालण्याची परवानगी दिली आहे.

2016 मध्ये चीनमध्ये जोडप्यांना दुसऱ्या बाळास जन्म देण्याची परवानगी दिली. पण, यानंही घटणाऱ्या जन्मदरात कोणताही फरक पडला नाही. ज्यामुळं अखेर आता चीन तिसऱ्या बाळाच्या जन्मासंबंधीच्या निर्णय़ावर पोहोचलं आहे आणि याचाच एक भाग म्हणून चीनने आता टू चाईल्ड धोरण रद्द करण्याची घोषणा केली आहे.सरकारच्या या धोरणाचे नागरिकांनी जंगी स्वागत केले आहे.

गेल्या काही वर्षांत चीनमध्ये जन्मदर घटला आहे. तसेच वयोवृद्ध लोकांची संख्या वाढत असल्याचे एका अहवालातून समोर आले. वयोवृद्ध लोकसंख्येमुळे भविष्यात परिणाम जाणवतील, या भीतीने चीन सरकारने हा निर्णय घेतला आहे.दरम्यान, सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेत वाढ करण्यासंबंधीच्या नियमांनाही योग्य पद्धतीने लागू करण्यात येणार असून यासंदर्भातील बैठक राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडेल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!