Share

६ जूनला हजारो मराठे रायगडावर दाखल होणार, सरकारने थांबून दाखवावे!

Published On: 

औरंगाबाद : राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या जर ६ जूनपर्यंत पूर्ण केल्या नाहीत तर महाराष्ट्रात आक्रमक आंदोलने करून, प्रत्येक आमदाराच्या दारात येणाऱ्या काळात आंदोलने करु. सरकारने मराठा समाजात अशांतता पसरवू नये, मराठा समाजात सरकारच्या चालढकलीमुळे प्रचंड रोष आहे आणि सरकारने त्यामध्ये तेल ओतण्याचे काम करण्यापेक्षा, मराठा समाजाच्या मुख्य मागण्याची सोडवणूक करावी अन्यथा हे आंदोलन सरकारच्या हाताबाहेर जाईल. ६ जूनला हजारो मराठे रायगडावर दाखल होणार असल्याचा इशारा यावेळी मनोज जरांगे पाटिल यांनी दिला आहे.

यावेळी बोलताना पुढे ते म्हणाले, मराठा समाज ओबीसीचे आरक्षण मागत आहे आणि सरकार आम्हाला ईडब्ल्यूएस आरक्षण देत आहे जे पूर्वीपासूनच लागू आहे. जर ईडब्ल्यूएसचे १० टक्के आरक्षण घेतलेच तर शिल्लक राहिलेल्या विद्यार्थ्यांचे काय? जर यानुसार २०१४ ते २०२० पर्यंतच्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्त्या दिल्या तर राहिलेल्या ३ टक्के विद्यार्थ्यांचे काय होणार? या विद्यार्थ्यांना नियुक्त्या कशा प्रकारे देणार याचाही सरकारने विचार तातडीने करावा. पदे निर्माण करून या सर्व विद्यार्थ्यांचा सामावेश सरकारने करावा नसता राज्यभर पुन्हा आम्ही या विद्यार्थ्यांसाठी आंदोलन पुकारणारच आहोत अशी भूमिका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटिल यांनी घेतली आहे.

छत्रपती संभाजीराजे यांनी दिलेल्या एकाही मागण्याबाबत सरकार अजूनही सकारात्मक नाही जर सरकारने अशीच गोडगोड बोलून, दिखाऊपणा करत मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला तर मग आम्ही सरकारच्या विरोधात आक्रमकपणे रस्त्यावर उतरून आंदोलन करणारच असेही त्यांनी सरकारला ठणकावले आहे. ६ जूनला राज्याभिषेक दिनी किल्ले रायगडावरून छत्रपती संभाजीराजे हे आंदोलनाचे रणशिंग फुंकणार आहेत यासाठी मराठवाड्यातून हजारो मराठे रायगडावर दाखल होणार आहेत असेही जरांगे पाटिल यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!