Share

एकवेळ केंद्रातलं सरकार पडेल पण महाराष्ट्रातील सरकार पडणार नाही; पटोलेंच फडणवीसांना प्रत्युत्तर

Published On: 

मुंबई : महाविकास आघाडी सरकारवर एकदा ही टीकेची संधी न सोडणारे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर देवेंद्र फडणवीस ते काल जळगावच्या दौऱ्यावर होते. त्यांनी मुक्ताईनगरमधून आपल्या दौऱ्याला सुरुवात केल्यानंतर भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसेंच्या घरी भेट दिली.

यावेळी भाजप नेते व आमदार गिरीश महाजन देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी एकनाथ खडसेंच्या सून तथा भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. या दोन घडामोडींमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

फडणवीसांनी काल माधम्यांशी बोलताना सत्तांतराबाबतचा नवा मुहूर्त सांगितलं होता. ‘‘सध्या आपण कोविड मधून चाललो आहोत. आणि कोविडचा विषय असल्याने राजकीय सत्तांतर व बाकी सगळ्या गोष्टी याकडे आमचं कोणतंही लक्ष नाही, लक्ष देण्यासाठी आमच्याकडे वेळ देखील नाही. एकदा कोविडची लढाई संपली की मग या गोष्टींमध्ये लक्ष घालू,’ असं फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे कोरोना संपल्यानंतर मात्र पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत फडणवीसांनी दिले होते.

दरम्यान, फडणवीसांच्या या विधानावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीतून खोचक प्रत्युत्तर दिलंय. ‘कोरोनानंतर केंद्रातील सरकार पडणार का ?’ असा टोला पटोलेंनी लगावला आहे. तसेच, ‘फडणवीस हे वकील आहेत, त्यामुळेच ते याबाबत तारीख पे तारीख देत आहेत. मेगा भरतीतून आलेले आमदार पक्षात टिकवण्यासाठी ते अशी विधान करत आहेत. मात्र, एकवेळ केंद्रातलं सरकार पडेल पण महाराष्ट्रातील सरकार पडणार नाही,’ असा दावा देखील पटोले यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!