औरंगाबाद : कोरोनामुळे संपूर्ण देशात मोठे संकट उभे राहिले आहे. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. औरंगाबादेतही ४०० विद्यार्थी परदेशी शिक्षण घेण्यासाठी प्रतिक्षेत आहे. मात्र लसीकरण झाल्याशिवाय हे विद्यार्थी कुठल्याही परिस्थितीत परदेशी जाऊ शकत नाही. त्यामुळे महापालिकेने या विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण अभियान राबवणार आहे. शहरातील तीन आरोग्य केंद्रात उद्यापासून तीन दिवस परदेशी जाणाऱ्या नागरिकांसाठी विशेष लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे.
शहरातील बन्सीलाल नगर आरोग्य केंद्र, जटवाडा चेतना नागर आरोग्य केंद्र, औरंगपुरा आरोग्य केंद्र याठिकाणी ३, ४ व ५ मे रोजी परदेशी जाणाऱ्या नागरिक, विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार असल्याची माहिती मनपाच्या वतीने देण्यात आली. या नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी आधार कार्ड, पॅनकार्ड, व्हिसा, अॅडमिशन लेटर तसेच नोकरीसाठी जात असाल तर त्यासंबंधीचे प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक आहे. महापालिका प्रशासनाने शहरातून विदेशात शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी शासनाकडून मार्गदर्शन मागवले होते.
सद्यस्थितीत ४५ वर्षांवरील नागरिकांचेच लसीकरण केले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना यातून वगळले आहे. शासनाकडून लसींचा हवा तेवढा पुरवठा होत नसल्यामुळे शहरात अनेक जण लसीकरणापासून वंचित आहेत. नुकतेच राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी विदेशात शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थ्यांचे लसीकरण प्राधान्याने करावे, असे मत व्यक्त केले आहे. त्याच अनुषंगाने पालिकेने शासनाकडून पत्राद्वारे या विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- फडणवीस का आले होते खडसेंच्या घरी? रक्षा खडसेंनी केला खुलासा
- धक्कादायक : मानवाला बर्ड फ्लूचा संसर्ग; चीनमधील घटनेने जगाचे टेन्शन वाढलं
- गाव कोरोनामुक्त कराल तर मिळेल ‘इतकी’ रक्कम; राज्य सरकारने केली कोरोनामुक्त गाव स्पर्धेची घोषणा
- कुणी शाळा घेता का शाळा? २०० शाळा विक्रीला, तर मराठवाड्यात १३०० शाळा बंद होण्याच्या मार्गावर!
- काय हे दुर्दैव! वाढदिवसाच्या दिवशी सोनाक्षी सिन्हा सोशल मीडीयावर ट्रोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

