मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही नेते एकत्र येण्याबाबत नेहमीच चर्चा होते. राज ठाकरे यांना आज या प्रश्नावर पुन्हा डिवचण्यात आलं. यावेळी त्यांनी दोनच शब्दात पण मिश्किल उत्तर दिलं. त्यामुळे राज आणि उद्धव एकत्र येणार का? याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार का? हा प्रश्न सर्वांच्या भावनिक जिव्हाळ्याचा होऊन बसला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना काल एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत हाच प्रश्न पुन्हा एकदा विचारण्यात आला असता त्यांनी अगदी दोनच शब्दांत मार्मिक उत्तर दिलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार का? असं विचारलं असता राज ठाकरे यांनी ‘परमेश्वरास ठाऊक’ अशा दोनच शब्दांत उत्तर दिलं. आत्ता सध्याचा काळ पाहता या प्रश्नांची उत्तरं नाहीत. इतर कुणाकडेही असतील असं वाटत नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंच्या या विधानानंतर आता शिवसेनेची पहिलीच प्रतिक्रिया आली आहे. शिवसेना नेते व खासदार अरविंद सावंत यांना माध्यमांनी याबाबत प्रश्न केला असता ते म्हणाले, ‘राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? हा प्रश्नच मला आशावादी वाटत नाही. त्यांना हा प्रश्न का विचारण्यात आला?, त्यावर राज यांनी का उत्तर दिलं? हे त्यांनाच माहीत,’ असं अरविंद सावंत म्हणाले.
यासोबतच, ‘निवडणुकीच्या आधी आणि नंतरही या चर्चा होत असतात. आता मीडिया चर्चा करत आहेत, असं सांगत सगळ्याच गोष्टी भविष्यात बघितल्या जातील, असं अरविंद सावंत यांनी सांगितलं. यासोबतच समाजकारण आणि राजकारणात काहीही घडू शकतं,’ असं विधान देखील अरविंद सावंत यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- गाव कोरोनामुक्त कराल तर मिळेल ‘इतकी’ रक्कम; राज्य सरकारने केली कोरोनामुक्त गाव स्पर्धेची घोषणा
- ‘फडणवीसांच दुःख समजू शकतो, त्यांच्या टीकांना मी गंभीरपणे घेत नाही’; संजय राऊतांच प्रत्युत्तर
- ‘ओबीसी समाजावर अन्याय होत असताना भुजबळ, वड्डेट्टीवार हे नेते मात्र सत्तेत रममाण झाले’
- ‘सत्ता येणार… सत्ता येणार असे बोलून भाजपचे नेते जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत’
- राज्यपाल कोट्यातील आमदारांच्या यादीबाबत अद्याप राज्य सरकारच ठाम नाही ? भाजपचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

