Share

औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्याच दिवशी ३०-४४ वयोगटातील ७७९ जणांचे लसीकरण

Published On: 

औरंगाबाद : शासननिर्देशानुसार राज्यात ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला शनिवारपासून प्रारंभ झाला आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोहिमेच्या पहिल्या दिवशी एकूण ७७९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

लसीकरणाच्या पहिल्या टप्यात फ्रंटलाईन वर्कर्सच लसीकरण करून घेतले होते. यानंतर ६० वर्षावरील नागरिकांना प्राधान्य देण्यात आले. सुरुवातीला ज्येष्ठांनी लसीकरणासाठी उत्साह दाखविला मात्र गेल्या काही दिवसात ज्येष्ठांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, पुढील टप्प्यात आता ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठीच्या सूचना आरोग्यसेवा अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार, शनिवारपासून या मोहिमेला शहर व जिल्ह्यात प्रारंभ करण्यात आला.

या अंतर्गत मोहीमच्या पहिल्या दिवशी शनिवारी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकूण ७७९ नागरिकांना लस देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी दिली. वयोगट ३० ते ४४ साठी जिल्ह्यात ८ ठिकाणी लसीकरण केंद्र देण्यात आले आहेत. यात वाळुज, आमठाणा, मनुर, बाजारसावंगी, अडुळ, लाडसावंगी, औराळा याप्राथमिक आरोग्य केंद्रासह करमाड ग्रामीण रुग्णालयाचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!